Anna Prakriya Udyog Yojana : केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (Anna Prakriya Udyog Yojana) योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या या योजनेत महाराष्ट्रातील 22 हजार 10 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्याबरोबरच बिहारमध्ये पण 21 हजार 248 ,तर त्यानंतर उत्तर प्रदेश मध्ये 15 हजार 449 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे .

राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक मदत
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात तब्बल 2,263 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तसेच, राज्यातील लाभार्थ्यांना 389 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. Anna Prakriya Udyog Yojana
हे वाचा : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी चा हप्ता जमा होण्यास सुरुवात…
संभाजीनगर जिल्ह्याची आघाडी
योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले आहे. त्यानंतर अहिल्यानगर (औरंगाबाद) दुसऱ्या क्रमांकावर तर सांगली जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. राज्यातील या जिल्ह्यांनी अन्नप्रक्रिया उद्योगात भरीव योगदान दिले आहे.
Anna Prakriya Udyog Yojana योजनेचे फायदे आणि मदत
ही योजना शेतकऱ्यांना कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगात मदत करणारी असून खालील गोष्टींसाठी अर्थसहाय्य दिले जाते:
- वैयक्तिक लाभार्थी आणि सामायिक पायाभूत सुविधा: प्रकल्प किमतीच्या 35% किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपये मदत.
- मूल्य साखळी, इन्क्युबेशन केंद्र: प्रकल्प किमतीच्या 35% किंवा जास्तीत जास्त 3 कोटी रुपये मदत.
- स्वयंसहायता गट: बीज भांडवल, मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी विशेष मदत.
त्यानुसार राज्यातील या योजनेअंतर्गत 22 हजार 10 प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने महाराष्ट्राने देशात नंबर एक क्रमांक मिळवलेला आहे . महाराष्ट्र हे देशात 22 हजार मजुरीचा टप्पा पार करणारे पहिले राज्य ठरले आहे .
दुसऱ्या क्रमांकावर बिहार आहे या बिहारमध्ये 21 हजार 248 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत .तसेच उत्तर प्रदेश येथे 15 हजार 449 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत उत्तर प्रदेश राज्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे .
लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले
या (Anna Prakriya Udyog Yojana) योजनेच्या माध्यमातून राज्यात डबल 2 हजार 263 कोटीची गुंतवणूक राज्यात झाली आहे . तर या योजनेच्या माध्यमातून 389 कोटी रुपयाची अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले आहे ,अशी माहिती राज्याची कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक विजयकुमार आवटे यांनी दिले आहे.
प्रक्रिया उद्योगांचा विभागवार सहभाग
या (Anna Prakriya Udyog Yojana) योजनेअंतर्गत विविध उत्पादन क्षेत्रांना मंजुरी मिळाली असून, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- तृणधान्य उत्पादने: 4,369 प्रकल्प
- मसाले उत्पादने: 3,522 प्रकल्प
- भाजीपाला उत्पादने: 3,242 प्रकल्प
- कडधान्य उत्पादने: 2,723 प्रकल्प
- फळ प्रक्रिया उद्योग: 2,160 प्रकल्प
- दुग्ध उत्पादने: 2,099 प्रकल्प
- तेलबिया उत्पादने: 830 प्रकल्प
- पशुखाद्य उत्पादने: 553 प्रकल्प
- ऊस प्रक्रिया उद्योग: 446 प्रकल्प
- मास उत्पादने: 120 प्रकल्प
- वन उत्पादने: 98 प्रकल्प
- सागरी उत्पादने: 39 प्रकल्प
- लोणचे उत्पादने: 41 प्रकल्प
- इतर: 1,312 प्रकल्प
राज्यातील प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती
राज्यात आतापर्यंत 29,183 लाभार्थ्यांना अन्नप्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले असून, यातही महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या योजनेंतर्गत अनेकांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली असून, अन्नप्रक्रिया उद्योगाला नवे बळ मिळाले आहे.
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. मोठ्या प्रमाणात प्रकल्पांना मंजुरी, गुंतवणूक आणि अनुदानाच्या मदतीने राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगाला गती मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक संधी मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.Anna Prakriya Udyog Yojana