Antyodaya Yojana : शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून रेशन सोबत आता मिळणार खास भेटवस्तू…

Antyodaya Yojana : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाचा शिधा वाटत झाल्यानंतर लगेच थोड्या काही दिवसानंतर विधानसभा निवडणूक लागली. त्यानंतर सरकार रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर कधी देणार याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती. आता स्वस्त धान्य लाभार्थ्यांना एक सरकारकडून खास गिफ्ट मिळणार आहे.

रेशनकार्डधारकांसाठी सरकारकडून सतत काही ना काही नव्या योजना जाहीर केल्या जातात. याही वर्षी स्वस्त धान्य लाभार्थ्यांसाठी एक खास भेट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे येत्या होळीच्या सणाला त्यांना ही भेट मिळणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच त्यांची दिवाळी होणार आहे.  काय आहे हे गिफ्ट?

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Antyodaya Yojana

Antyodaya Yojana अंत्योदय योजनेत साडी मिळणार

मागील वर्षी राज्य सरकारने अंत्योदय योजनेतून (Antyodaya Yojana) स्वस्त धान्य घेणाऱ्या कुटुंबातील एका महिलेला मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचीच पुनरावृत्ती यंदाही करण्यात आली आहे. होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल आहे . त्या मुळे या वर्षीच्या होळीलाच रेशनच्या धान्यासोबत साडी मिळणार आहे. या भेट वस्तूचेवाटप स्वस्त धान्य लाभार्थ्यांला मार्च महिन्याच्या अखेरीस वाटप होणार आहे.

राज्यातील पुरवठा विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या रेशन दुकानातून ही साडी मोफत दिली जाणार आहे. जालना जिल्ह्यात जवळपास 44 हजार 160 महिलांना अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साडी मिळणार आहे. तर पुणे जिल्ह्यात 48 हजार 874 महिलांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये सर्वात जास्त लाभ हा 7 हजार 975 साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत. अंत्योदय रेशन (Antyodaya Yojana) कार्डधारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते . या साड्यांचे वाटप होळीपर्यंत करण्यात येणार आहे अशी माहिती आहे .

हे वाचा : महिलांना 50% सवलत दिल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात; राज्य सरकारचा मोठा निर्णय

साडी तपासूनच घ्या

राज्यातील अंत्योदय रेशन (Antyodaya Yojana) कार्ड लाभार्थ्यांना या अगोदर पण एक साडी मोफत देण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. गेल्या वर्षी सुद्धा मार्च महिन्यामध्ये अंत्योदय रेशन कार्ड धारकांना साड्याचे वाटप करण्यात आले होते. पण मात्र त्यावेळेस वाटप केलेल्या साड्या ह्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच महिला नाराज झाल्या होत्या. गेल्या वर्षी तसे झाल्यामुळे यावर्षी स्वस्त धान्य दुकानावरच या साड्या तपासून घ्या. मागच्या वर्षी एका साडीसाठी राज्य सरकारने राज्य यंत्रमाग महामंडळाला 355 रुपये मोजले होते .स्थानिक स्तरावर पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानातून या साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. पण महिलांनी ही साडी स्वस्त धान्य दुकानावरच तपासून घ्यावी. आणि यामध्ये जर दोष असल्यास लगेच तक्रार नोंदवा. Antyodaya Yojana

Leave a comment