Asmita Loan :आता महिलांना मिळणार कमी दरात विना गॅरंटीचं लोन; SBI ने आणलं नारी शक्ति कार्ड

Asmita Loan : महिला उद्योजकांना आर्थिक मदतीसाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतातील मोठ्या बँकांनी आंतरराष्ट्रीय (Women ‘s Day 2025) महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर व्याजदराने विनाकारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत. भारतीय स्टेट बँक (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) यांनी कमी व्याजदरात आणि सुलभ प्रक्रियेत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Asmita Loan

एसबीआयची “अस्मिता” योजना Asmita Loan

भारतीय स्टेट बँकेने आंतरराष्ट्रीय (Women ‘s Day 2025 ) महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी “अस्मिता” योजना जाहीर केली आहे. यामध्ये महिला उद्योजकांना कमी व्याजदराने आणि विना गॅरंटी कर्ज मिळणार आहे.

अस्मिता योजनेची वैशिष्ट्ये

  • महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज सुविधा.
  • व्याजदर कमी आणि प्रक्रिया सुलभ.
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) मदत.
  • महिलांसाठी “नारीशक्ती प्लॅटिनम डेबिट कार्ड” सुरू.

Asmita Loan सार्वजनिक क्षेत्रातील सर्व मोठ्या बँकेने नारीशक्ती प्लॅटिनम डेबिट कार्ड देखील सादर केले ,जे विशेषता: महिलांसाठी डिझाईन करण्यात आलंय एसबीआयचे चेअरमन सी. एस. शिट्टी यांनी सांगितले की, या नव्या योजनेमुळे महिलांना उद्योग सुरू करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तर एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक विनय टोन्स यांनी सांगितले की, हा उपक्रम तांत्रिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठी क्रांती घडवेल.

बँक ऑफ बडोदा

एसबीआयच्या पावलावर पाऊल टाकत बँक ऑफ बडोदानंही (BOB) शुक्रवारी भारतीय वंशाच्या महिलांसाठी बॉब ग्लोबल वुमन्स एनआरई आणि एन आरओ सेव्हिंग्ज अकाउंट सुरू केल्याची घोषणा केली .यामध्ये महिला ग्राहकांना ठेवीवर जास्त व्याज,गृह कर्ज आणि वाहन कर्ज कमी प्रोसेसिंग फीसह अशा सुविधा देण्यात येणार आहेत

योजनेची वैशिष्ट्ये

  • महिला ग्राहकांना ठेवींवर अधिक व्याजदर.
  • गृहकर्ज आणि वाहन कर्जावर कमी प्रोसेसिंग फी.
  • लॉकर भाड्यावर सवलत.
  • देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लाउंजमध्ये मोफत प्रवेश.
  • वैयक्तिक आणि हवाई अपघात विमा संरक्षण.

बँक ऑफ बडोदाने सांगितले की, सुधारित BOB प्रीमियम NRE आणि NRO बचत खात्यात अनेक खास सुविधा देण्यात येतील. यामुळे महिला ग्राहकांना आर्थिक निर्णय अधिक सुलभ होतील.

हे वाचा: पीएम इंटर्नशिप 2025

महिला सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल

Asmita Loan एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाच्या या योजनांमुळे महिला उद्योजकांना मोठा आधार मिळणार आहे. खास करून लघु आणि मध्यम उद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी कमी व्याजदर आणि सुलभ प्रक्रिया ही मोठी संधी ठरू शकते.

महिला सशक्तीकरणासाठी असे आर्थिक निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यास मदत करतील आणि महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रेरित करतील. Women ‘s Day 2025

1 thought on “Asmita Loan :आता महिलांना मिळणार कमी दरात विना गॅरंटीचं लोन; SBI ने आणलं नारी शक्ति कार्ड”

Leave a comment

Close Visit Batmya360