ayushman bharat card भारत सरकारची महत्वाची योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना अथवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (PMJAY) अंतर्गत, देशातील गरीब आणि दुर्बल घटकांतील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी “आयुष्यमान भारत कार्ड” तयार केले जाते. या कार्डचा लाभ लाभार्थ्यांना सरकारी व खाजगी हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार मिळतात. आजच्या लेखामध्ये आपण आयुष्यमान भारत कार्ड कसे डाउनलोड करावे याची संपूर्ण व सविस्तर माहिती पाहुयात.
1. आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काही माहिती आणि कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड किंवा रेशन कार्ड (ओळख दर्शविण्यासाठी)
- मोबाईल नंबर (OTP सत्यापनासाठी)
- इंटरनेट कनेक्शन असलेला स्मार्टफोन किंवा संगणक (कम्प्युटर)
2. आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया
आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील पद्धत वापरा
१. PMJAY अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
- सर्वप्रथम, https://pmjay.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. ‘आयुष्यमान कार्ड’ पर्याय निवडावा
- वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर तुम्हाला “आयुष्यमान कार्ड” हा पर्याय दिसेल. त्या वरती क्लिक करा.
३. आपले मोबाईल नंबर आणि OTP तपासा
- आपला आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर OTP द्वारा मोबाइल क्रमांक सत्यापित करा. आपल्या आधार लिंक मोबाइल क्रमांकावर आलेला otp भरून घ्या.
हे वाचा: रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती.
४. लाभार्थी यादीत नाव तपासा
- OTP तपासणी नंतर, तुमचे नाव लाभार्थी यादीत शोधा. जर नाव यादीत असेल तर तुम्हाला कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जर आपण केवायसी केलेली नसेल तर, आपणास केवायसी करणे अवश्यक आहे तरच आपले कार्ड आपल्याला डाउनलोड करता येईल.
५. कार्ड डाउनलोड करा ayushman bharat card
- “डाउनलोड कार्ड” पर्यायावर क्लिक करा. तुमचे आयुष्यमान भारत कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होईल.
निष्कर्ष
आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करणे एक सोपी प्रक्रिया आहे, आणि यामुळे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत उपचार मिळण्यास मदत होते. हे कार्ड तुम्हाला सरकारच्या अनेक आरोग्य योजनांचा लाभ घेण्यास सक्षम करते, म्हणूनच ते वेळेवर डाउनलोड करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
लाभार्थी यादीत नाव नसल्यास, जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधा किंवा अधिकृत आयुष्यमान मित्र केंद्रातून मदत मिळवा. यादीत नाव असताना देखील कार्ड डाउनलोड होत नसेल तर, आपले कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपली आयुष्यमान भारत कार्ड साठी अवश्यक असणारी केवायसी करून घ्या.
1 thought on “ayushman bharat card असे करा आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड.”