BANK OF BARODA सर्वसामान्य नागरिकांना भविष्यात उपयोगात येणारी रक्कम साठवून ठेवणे अवश्यक असते. पण साठवलेली रक्कम यावर काही प्रमाणात व्याज परतावा मिळवा जेणे करून त्यांच्या उत्पन्न वाढीस मदत मिळेल हा हेतु असतो. रक्कम गुंतवणूक करतांना जास्त परतावा कसा मिळेल या कडे गुंतवणूक नेहमीच लक्ष देत असतात. यातच जास्त परतावा तसेच सुरक्षित गुंतवणूक करणे देखील खूप महत्वाचे असते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकार ने प्राधिकृत केलेल्या विश्वासार्ह संस्था बँक यांचा समावेश असतो परंतु काही वेळा अनेक बँकाकडून नागरिकांना काही ऑफर दिल्या जातात ज्या ऑफर च्या मध्यमातून जास्त परतावा देखील दिला जातो. आज आपण बँक ऑफ बडोदा ची खास ऑफर पाहणार आहोत.
बँक ऑफ बडोदा (BANK OF BARODA) या भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने 400 दिवसांची BOB उत्सव ठेव योजना सुरू केली आहे जी केवळ सणासुदीच्या काळाचे नीमत्त साधून लागू करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत सर्वसामान्यांसाठी 7.30 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी (80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणारे) 7.95 टक्के व्याज दर दरवर्षी नॉन-कॉलेबल डिपॉझिटवर समाविष्ट केला जाईल. BANK OF BARODA उत्सव 14 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू करण्यात आला आहे आणि 3 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू असेल. ही योजना मर्यादित कालावधी साठी आहे. सणासुदीच्या काळात बँकेकडून ३ ते ५ वर्षांच्या ठेवीवरील व्याजवाढ करण्यात आली आहे.
हे वाचा: मतदान नोंदणी प्रक्रिया
ही दरवाढ ६.५० टक्क्यांवरून ६.८० टक्के करण्यात आली आहे. हा वाढीचा दर BOB एसडीपी ग्राहकांनाही लागू असेल, जे 3 ते 5 वर्षांसाठी दर महा योगदान देताना जास्त व्याज दर लागू करू शकतात. बँक ऑफ बडोदाची रिकरिंग डिपॉझिट स्कीम : BOB एसडीपी दरमहा नियमित बचतीद्वारे परताव्याची हमी देते. निवडक कालावधीच्या BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिटच्या व्याजदरातही ३० बीपीएसने वाढ करण्यात आली आहे. बँकेने ८० वर्षांवरील ग्राहकांची सुपर सिनिअर सिटिझन कॅटेगरी सुरू केली असून मुदत ठेव विभागात प्रथमच १ ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त १० बीपीएस व्याज दर असणार आहेत.
BANK OF BARODA काय आहे ऑफर
बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबदत्त चंद म्हणाले, “या सणासुदीच्या हंगामात ठेवींवर विविध ऑफर्स देऊन ग्राहकांना जास्तीत जास्त आनंद देताना आम्हाला आनंद होत आहे, ज्यामुळे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात पैसे वाचत आहेत. BOB उत्सव ठेव योजना ही ठेवीदारांना या व्याजदर चक्रात जास्त व्याज मिळण्याची चांगली संधी आहे. आम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांना सेवा देत आहोत – एक जो मध्यम कालावधीसाठी स्पर्धात्मक आणि खात्रीशीर परताव्याच्या शोधात आहे, तसेच ज्या ग्राहकांना BOB एसडीपीद्वारे दर महा नियमित योगदानाद्वारे बचत करायची आहे, त्यांना प्रत्येक महिन्याच्या ठेवीवर जास्त व्याज दर मिळेल”.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळील बँक ऑफ बडोदा च्या शाखेशी संपर्क साधावा.