BEED NEWS COLLECTOR CAR ; न्यायालयाचा आदेश; जिल्हाधिकारी याची गडीच जप्त.

BEED NEWS COLLECTOR CAR डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या अंतर्गत कायदा व नियम निर्गमित करण्यात आले. या कायद्याच्या अंतर्गत कोणाला सुटका मिळत नाही असे आपण बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत. परंतु बीड जिल्ह्यातील न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून न्यायालयाने थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेशच निर्गमित केले आहे. या आदेशाचे पालन करून बीड जिल्हाधिकारी यांची गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे. काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर माहिती.

BEED NEWS COLLECTOR CAR

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी तलावात गेल्या होत्या. या शेतकऱ्यांना शासनाकडून मावेजा न दिल्याने कोर्टाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश देऊन गाडी जप्त करण्यात आलेले आहे. या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाद्वारे सर्व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

BEED NEWS COLLECTOR CAR

चिखल बीड येथील शेतकरी संतोष टोंगे शिवाजी टोंगे व बाबू मुंडे या शेतकऱ्यांची शेती योग्य जमीन लघु सिंचन तलावासाठी शासनाने हस्तांतरित केली होती. जमिनीचा शेत जमीन मालकांना अगदी कमी प्रमाणात मावेजा देण्यात आलेला होता. कमी प्रमाणात मावेजा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी माजलगाव येथील सत्र न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा: तूर हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी सुरू.

दाखल केलेला हा दावा कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे मान्य करून 29 ऑक्टोबर 2015 रोजी या शेतकऱ्यांना वाढीव मायोता द्यावा असा निकाल कोर्टाने दिला होता. मात्र शासनाने काही प्रमाणात रक्कम देऊन पुढे चालढकल सुरू केली होती. यामुळे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बुधवंत साहेब यांनी व्याज लावून सदर रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेशच निर्गमित केले होते. जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दहा दिवसापूर्वी निर्गमित करण्यात आले होते.

BEED NEWS COLLECTOR CAR या आदेशाच्या अनुषंगाने कोर्टाचे वादी वकील यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांच्यासमोर आपली बाजू मांडून रक्कम वितरित करण्यास सांगितले. मात्र जिल्हाधिकारी यांनी सध्या पैशाची पूर्तता करू शकत नाही; तुम्ही गाडी घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर कोर्टाच्या बेलिपाने जिल्हाधिकारी यांची गाडी (एम एच 23 बीसी 2401) कायदेशीर बाबी ची पूर्तता करून जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली गाडी माजलगाव कोर्टात जमा करण्यात आलेली आहे. यामुळे संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.BEED NEWS COLLECTOR CAR

Leave a comment