Beer Or Liquor Shop In Maharashtra बियर किंवा दारुचे दुकान चालकांना दणका; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय !

Beer Or Liquor Shop In Maharashtra : राज्यातील अनेक शहरांत आपल्याला गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान आपल्याला पाहायला मिळतात .पण आता राज्य सरकारने या दारू विक्री दुकानांच्या संदर्भात एक (Beer Or Liquor Shop In Maharashtra) महत्वपूर्ण निर्णय हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत या संदर्भातील घोषणा केली आहे.

Beer Or Liquor Shop In Maharashtra

मागील काही वर्षांपासून मुंबईसह राज्यात दारुच्या दुकानांच्या संख्येत सातत्याने वाढ होतना पाहायला मिळते .यामुळे तरुण पिढी ही व्यसनाधिनतेकडे वळत आहे. तसेच जी दारुची दुकाने गृहनिर्माण सोसायटीत आहे त्यामुळेही कलह होत आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

हे वाचा: असा मिळवता येतो बियर बार परवाना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

Beer Or Liquor Shop In Maharashtra सभागृहात मुद्दा उपस्थित

आमदार महेश लांडगे आणि आमदार राहुल कूल यांनी राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यांमध्ये बियर आणि दारु दुकानांना बरवानगी दिली जात आहे. यामुळे कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनीही काही मुद्दे मांडले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना महत्त्वाची घोषणा केली आहे.

हे वाचा : शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय मिळालं ? पहा सविस्तर

बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु (Beer Or Liquor Shop In Maharashtra) करायचे असेल तर ईथूनपुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.अजित पवार यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील वातावरण कलहमुक्त राहण्यास, तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्यास प्रतिबंध होणार असून कायदा-सुव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

तसेच ,महापालिका वार्डमध्ये मद्यविक्रीचे दुकान बंद करायचे असेल नियमानुसार आलेल्या प्रस्तावावर झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान ज्या बाजूने होणार आहे त्या बाजूने निर्णय होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे . अजित पवार यांच्या या घोषणेचे समाजाच्या सर्व थरातून स्वागत होत आहे.

या निर्णयाचे फायदे

अजित पवार यांच्या या निर्णयामुळे:

  • गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये होणारे वाद आणि वादग्रस्त परिस्थिती टळेल.
  • तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्यास प्रतिबंध होईल.
  • कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्यास मदत होईल.

दारु दुकाने बंद करण्याचा मार्ग

उपमुख्यमंत्री अजित पवार असे म्हणाले की,सरकारची भूमिका राज्यात दारू विक्री वाढविणे अशी नाही . त्यामुळे दारूबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करायची आहे . तसेच, अनेक दशकापासून राज्यात दारू विक्रीचे परवाने बंद आहे . शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात दारू दुकानांना परवानगी नाही . स्थानिकांचा बियर किंवा दारूचे दुकान बंद करण्याचा विरोध असेल तर मतदानाद्वारे बंद करण्याचा कायदा आहे . त्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी दारू दुकान सुरू ठेवायचे किंवा बंद करायचे असेल तर महापालिका वार्डामध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान ज्या बाजूने होईल, त्या बाजूने निर्णय घेतला जाईल .Beer Or Liquor Shop In Maharashtra

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

शासनाची भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, सरकारची भूमिका राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन देण्याची नसून, अवैध दारुविक्री रोखण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात दारुची दुकाने सुरू करण्यास मनाई आहे. तसेच स्थानिकांचा विरोध असल्यास मतदानाद्वारे दारु दुकान बंद करण्याची तरतूदही आहे.

कायदा-सुव्यवस्था सुधारण्यावर भर

  राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून आलेल्या सूचना गांभीर्याने विचारात घेतल्या जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Beer Or Liquor Shop In Maharashtra) सभागृहात दिले.

निष्कर्ष

या नवीन निर्णयामुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच तरुण पिढी व्यसनाधिनतेपासून दूर राहण्यास मदत होईल. शासनाने घेतलेला हा निर्णय समाजाच्या सर्व थरातून स्वागतास पात्र ठरत आहे. Beer Or Liquor Shop In Maharashtra

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria


Leave a comment