Crop Insurance – शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा

Crop Insurance - शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा

Crop Insurance – शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा शेतकरी बांधवांनो crop insurance – राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयांमध्ये पिक विमा. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा crop insurance  मिळणार याची घोषणा केली.राज्यातील शेतकऱ्यांना आता एक रुपयांमध्ये पिक विमा मिळणार आहे बाकीचा हिस्सा  राज्य शासन स्वतः भरणार … Read more

Mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र – आपण पात्र की अपात्र

Mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना 2

            Mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र – आपण पात्र की अपात्र नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज पाहणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेत अर्ज केला आहे ते शेतकरी पात्र आहेत की अपात्र आहे या लेखातून आपण स्वतः या योजनेकरिता पात्र आहोत की अपात्र आहोत हे समजून घेऊया.दिनांक 17 मे 2023 पासून mahaurja  कुसुम सौर पंप कंपाउंड बी साठी नवीन नोंदणी चालू झालेली आहे सुरुवातीच्या काळात संकेतस्थळावर भरपूर प्रमाणात लोड येत असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यास खूप मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या कोठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना अर्ज सादर करणे शक्य होत नव्हते परंतु नंतर संकेतस्थळाला व्यवस्थित करून नवीन नोंदणी करणे सोयीस्कर  करण्यात आले आहे व बऱ्याच शेतकऱ्यांनी कुसुम सौर पंप कंपाउंड बी साठी अर्ज सादर केलेले आहे. आपण अर्ज तर सादर केलाय परंतु आपला अर्जाची पुढील प्रक्रिया काय असते पात्र शेतकरी व अपात्र शेतकरी कश्या पद्धतीने ठरवले जातात. त्याचे कोणते निकष असे आहेत ज्यातून आपला अर्ज अपात्र ठरू शकतो या या सर्व आपल्या मनात येणाऱ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आज या लेखामध्ये मिळणार आहेत.सोबतच एक कुसुम सौर पंप बसवण्यासाठी  आपणास किती खर्च येतो.अशा सर्व प्रश्नाची उत्तरे आपणास मिळणार आहेत.

Mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना 2

 

 

Mahaurja कुसुम सोलर सौर पंप योजना काय आहे ? 

महाउर्जा कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अमलात आणलेली आहे. याचा उद्देश असा आहे कि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे व शेतकर्यांना दिवसा सिंचनासाठी विद्युत पुरवठा करता यावा ह्या हेतूने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त आयोजनातून Mahaurja  कुसुम सौर पंप योजना राबवण्यास सुरवात झाली आहे.

Mahaurja अर्ज कोण करू शकतो ?

        mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र साठी वैयक्तिक  शेतकरी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक संघटना या पैकी कोणीही कुसुम  सोलर पंप साठी अर्ज करू शकतात .

अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत

कुसुम सोलर पंप साठी आपणास जर अर्ज करायचा असला तर आपणास १) आधार कार्ड २) सातबारा (ज्या वर सिंचनासाठी पाणी वापरत असलेल्या विहीर, बोअरवेल ( कुपनलिका ) शेततळे ,कालवा या पैकी एक नोंद सातबारेवर असणे आवश्यक आहे ),३)राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ४) एक पासपोर्ट साइज फोटो हे कागदपत्र आपणास नोंदणी साठी आवश्यक आहेत.

कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र नोंदणी कशी करावी 

https: // kusum. mahaurja .com/ solar / beneficiary/ register/ Kusum- Yojana- Component- B  

या संकेतस्थळा वर जा तिथे आपणास आधार नंबर, आपला राज्य, आपला जिल्हा, आपला तालुका, आपले गाव (ज्या ठिकाणी आपली  जमीन आहे)  आपला मोबाईल नंबर, आणि आपला प्रवर्ग, निवडा व नंतर पेमेंट फॉर ऑनलाइन एप्लीकेशन यावरती क्लिक करा पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर आपण नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो  ओटीपी समोर आलेल्या कॉलम मध्ये भरून सबमिट करा त्यानंतर आपल्या मोबाईलवर एम के आयडी आणि पासवर्ड मिळेल तो एमके आयडी पासवर्ड घेऊन https://kusum.mahaurja.com/beneficiary/ बेनेफेसरी  लॉगिन यावर टाकून लॉगिन करावे व आपली संपूर्ण माहिती पूर्ण भरून घ्यावी  व आपले कागदपत्रे अपलोड करा सर्वात शेवटी सबमिट ऑप्शन ला क्लिक करा अशा प्रकारे आपला अर्ज दाखल होईल.

आपण अर्ज केल्या नंतर पुढील प्रक्रिया 

आपण केलेल्या अर्जाची महाऊर्जामार्फत छाननी केली जाते ज्यामध्ये आपण भरलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे का आपण अपलोड केलेले सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत का स्पष्ट दिसतात का सातबारावर(विहीर, बोअरवेल ( कुपनलिका ) शेततळे ,कालवा ) जलस्त्रोत नोंदणी केली आहे का.आपण याआधी दुसऱ्या  कोणत्या(उदा. मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना,कुसुम सौर पंप योजना घटक अ ,अटल कृषी सौर पंप योजना )  योजनेतून सौर पंप लाभ घेतलेला आहे का अशा सर्व बाबी महाऊर्जामार्फत तपासल्या जातात.

 कुसुम सौर कृषी पंप योजना आपला अर्ज  पात्र की अपात्र असे करा चेक 

आपल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर आपणास मेडाच्या ॲपमध्ये सेल्फ सर्विस साठी ऑप्शन दिसेल जर ऑप्शन दिसत असेल तर आपला अर्ज पात्र ठरलेला आहे.(बऱ्याच वेळा सेल्फ सर्वे ऑप्शन येऊ नये अर्ज अपात्र ठरवला जातो) त्यासाठी आपण आणखी एक प्रकारे सुद्धा चेक करू शकतो. शेतकरी मित्रांनो आपला अर्ज पात्र आहे किंवा अपात्र आहे हे पाहण्यासाठी आपण  Mahaurja कुसुम महाऊर्जा या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा चेक करू शकतो त्यासाठी आपणास महाऊर्जाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. लिंक ला क्लीक केल्यानंतर आपणासमोर अशी

बब

प्रतिमा दिसेल त्यात आपणास मिळालेला एम के आयडी व पासवर्ड टाकून लोगिन करावे. लॉगिन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता ऑप्शन आले आहे का आपलं पेमेंट झालेल  आहे का पेमेंट केलं असेल तर कंपनी निवडली  आहे का या सर्व गोष्टी आपणास दिसतात. जर आपणास लॉगिन करताना  Your Application is not shortlisted login will be resume soon. असा  मेसेज आला तर तुमचा अर्ज अजून छाननी झालेला नाही. तुम्हाला अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

FAQ

Que 01)   मी माझी कुसुम योजना सौर पंप स्थिती कशी तपासू शकतो ?

Ans:          हो आपण महाउर्जा च्या बेनेफिसरी लॉगीन वर जाऊन आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकतो.

Que 02)  पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्रात उपलब्ध आहे का?

Ans:  महाराष्ट्रात कुसुम सोलर पंप २०२१ पासून उपलब्ध करण्यात आलेली आहे

Que 03)  पीएम कुसुम योजनेची एकूण किंमत किती आहे?

Ans:    महाराष्ट्रात कुसुम सोलर पंप बसवण्यासाठी 13.5 टक्के जीएसटी सहित किंमत खालील प्रमाणे

सौर पंप क्षमताएकूण किंमतसर्वसाधरण शेतकरी हिस्साअनु जाती/जमाती शेतकरी हिस्सा
         3 HP193803193809690
         5 HP2697462697513488
          7.5 HP3744023744018720

टीप: शासन व कंपनी यांच्या धोरणात बदल झाल्यास किंमत कमी जास्त होऊ शकते.

               

Close Visit Batmya360