Chandrakant Patil : राज्यातील महायुती सरकारने मुलींच्या मोफत शिक्षणासाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठोस पावले उचलली आहेत. त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी समित्या स्थापन करण्याच्या सूचनाही दिल्या.

महाविद्यालयांना भेटी आणि समस्यांची समज
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) , यांनी विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळतो आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी महाविद्यालयांना थेट भेट देण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर, विद्यार्थिनी आणि प्रशासन यांच्या संयुक्त समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले. यामुळे विद्यार्थिनींच्या समस्या लवकरात लवकर सोडवता येणार आहेत.
यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर आणि सहसंचालक प्रकाश बच्छाव उपस्थित होते. विद्यार्थिनींना शासकीय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी 31 मार्चपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.
हे वाचा : चेक च्या मागे सही कधी करावी; काय आहे नियम पहा सविस्तर.
शिक्षण शुल्क माफीचा निर्णय
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींसाठी राज्य सरकारने शिक्षण शुल्क माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्कात संपूर्ण माफी देण्यात आली असून, त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यभर दौरा आणि पुढील नियोजन
या निर्णयाची प्रभावी पने अंमलबजावणी होत आहे का, हे पाहण्यासाठी Chandrakant Patil यांनी राज्यातील 100 महाविद्यालयांना अचानक भेटी देणार आहेत. विद्यार्थिनींनी केलेल्या मागण्या, जसे की ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत भत्ता वाढवण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असेही (Chandrakant Patil) त्यांनी स्पष्ट केले. उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडून भरारी पथकांमार्फत विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असेही नमूद करण्यात आले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल होईल आणि अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण घेता येईल, अशी अपेक्षा आहे. Chandrakant Patil
1 thought on “Chandrakant Patil : मुलींच्या मोफत शिक्षणासाठी चंद्रकांत पाटलांची महत्त्वपूर्ण घोषणा!”