कापसाला मिळतोय कवडीमोल भाव : ही आहेत कारणे. cotton rate

कापसाच्या भावातील घसरण – शेतकऱ्यांना कापूस दरा बाबत चिंता.

cotton rate देशभरात दिवाळीचा सण सुरू असतानाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आनंद मिळण्याऐवजी कापसाच्या भावात झालेल्या घसरणीमुळे निराशा सहन करावी लागत आहे. त्या मुळे देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना देखील शेतकऱ्यांना मात्र चिंता व्यक्त करावी लागत आहे. सध्या कापसाचा बाजार भाव केंद्र सरकार ने ठरवलेल्या हमी भावापेक्षा 2,000 ते 2,500 रुपयांनी कमी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. शेतकऱ्यांनी कष्ट करून उगवलेला कापूस व्यापाऱ्यांना जास्त ओलावा असल्याने (जास्त ओलावा असल्याचे कारण देत) आवडत नसल्याने कमी दरात विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षाभंग होत आहे आणि मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

2024-25 मध्ये किती आहे कापसाचा हमीभाव

cotton rate 2024 -25 मध्ये केंद्र सरकार ने कापसाच्या हमीभावात 501 रुपयांची वाढ केली होती त्या नुसार कापसला 7521 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता. परंतु सरकार च्या या हमी भावाचे व्यापऱ्याकडून पालन केले जात नसल्याचे बाजारात पाहायला मिळत आहे.

चांगल्या कापसालाही मिळेना भाव cotton rate

ज्यांनी गुणवत्तायुक्त कापूस पिकवला आहे, त्यांना थोडाफार जास्त दर मिळत असला तरी बाजारभाव अजूनही हमी भावाच्या जवळ पोहचलेला नाही. गुजरात आणि इतर राज्यांमध्ये गुणवत्तायुक्त कापसाला चांगला दर मिळतोय, मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळत नाही. महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव हमी भावापेक्षा खूपच कमी असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे कष्ट आणि मेहनतीचे चीज होताना दिसत नाही. यामुळे राज्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच दिसत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

शेतकऱ्यांना ओला कापूस विक्रीसाठी का आणावा लागतो?

शेतकऱ्यांकडे ओला (पावसाने भिजलेला) कापूस साठवून ठेवण्याची सुविधा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसते, आणि तो साठवल्यास तो पिवळसर पडतो, खराब होतो ज्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते. यामुळे शेतकऱ्यांना कापूस ताज्या अवस्थेत विकावा लागतो. मात्र, ओलावा अधिक असल्यामुळे व्यापारी कमी भावात खरेदी करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरावर विक्री करावी लागते. हा ओलावा शेतकऱ्यांच्या हातात नसताना, त्यांच्या मेहनतीचे एवढे छोटे मूल्य मिळणे हे फार दुःखदायक आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांना मिळणार सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई

सोयाबीन दरातील घसरणीचा प्रभाव कापसाच्या विक्रीवर

सध्या सोयाबीनच्या दरातही घट झाल्याने अनेक शेतकरी सोयाबीन विक्री थांबवत आहेत आणि कापूस विक्री करण्याला प्राधान्य देत आहेत. हमी भाव जवळ असला तरी ओल्या कापसाचा दर कमी असल्यामुळे शेतकरी सोयाबीन ऐवजी कापसाची विक्री करण्याचा विचार करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकटाचे सावट निर्माण झाले आहे.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

सीसीआय खरेदी निकषात बदलाची मागणी

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) ने कापूस हमी भावाने खरेदी करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे, पण त्यासाठी ओलावा 12% असावा, ही मुख्य अट आहे. यापेक्षा अधिक ओलावा असल्यास सीसीआय कडून शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जात नाही. त्यामुळे शेतकरी आणि उद्योजकांनी 12% चा निकष 18% करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे अधिक ओलावा असलेला कापूसही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या माध्यमातून खरेदी केला जाईल.

शेतकऱ्यांना न्याय मिळेल का?

शेतकऱ्यांच्या या मागणीकडे सरकार आणि सीसीआय कसे लक्ष देतील, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. जरी त्यांना कापूस खरेदी निकषात बदल मिळाला तरी तो येणार्‍या काळासाठी होईल. सध्याच्या परिस्थितीत मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ नाही आणि आशा तुटलेली आहे. या सर्व कारणामुळे सध्या तरी राज्यातील शेतकरी होरपळून निघत आहे.

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

Leave a comment