Crop cover: फळबागाच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर चे फायदे!! उत्पन्नात होणार वाढ…

crop Cover : तंत्रज्ञानाशिवाय शेतीला पर्याय उरलेला नाही. कधी ऊन कधी पाऊस तर कधी पिकावर येणारे रोग. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. उत्पादन खर्चात वाढ होऊन देखील शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे कमीच राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक आणि उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. असे तंत्रज्ञान आणि आवश्यक असणारे क्रॉप कव्हर याचे फायदे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

Crop cover

क्रॉप कव्हर मुळे उत्पन्नात वाढ

मागील बऱ्याच वर्षापासून उन्हापासून फळबागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मिळणाऱ्या फळांची गुणवत्ता चांगली मिळत नाही. फळांची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे फळांना दर देखील चांगला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. यातच काही शेतकरी आपल्या फळबागाला क्रॉप कव्हर (Crop cover) संरक्षण देऊन आपल्या पिकाच्या गुणवत्तेत वाढ करत आहेत. अनेक शेतकरी या क्रॉप कव्हर च्या माध्यमातून आपल्या फळबागांचे उनापासून संरक्षण करण्यात यशस्वी ठरत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शेतीमधील फळबागांमध्ये प्रामुख्याने पेरू डाळी द्राक्ष या प्रकारच्या फळ पिकांना क्रॉप कव्हर चे संरक्षण दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होताना दिसत आहे. तुम्ही अनेक ठिकाणी अनेक फळबागांना पांढऱ्या शुभ रंगाच्या क्रॉप कव्हर लावलेले पाहिले असतील. हे क्रॉप कव्हर अनेक शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मग या क्रॉप कव्हर च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा फायदा मिळतो किती फायदा मिळतो हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. Crop cover

हे वाचा : प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी 50 टक्के अनुदान, असा करा अर्ज

क्रॉप कव्हर चे फायदे

उन्हाळी हंगामातील अति तीव्र स्वरूपातील सूर्यकिरणामुळे अनेक फळबागांचे नुकसान झालेले आपण पाहिले आहे. या सूर्यकिरणापासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हर अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. मनापासून मिळालेल्या संरक्षणामुळे पिकाची गुणवत्ता देखील चांगली निर्माण होत आहे. पिकांची चकाकी चांगली दिसून येत आहे. फळाच्या गुणवत्तेसोबतच फळांच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ या क्रॉप कव्हरच्या माध्यमातून निर्माण होत आहे.

या क्रॉप कव्हर (Crop cover) मुळे पिकावर येणाऱ्या रोगावर देखील नियंत्रण मिळवता येते. त्यासोबतच वातावरणातून येणारी धूळ,जंतू , कीटक यांचा फळाशी संपर्क होत नाही. यामुळे फळाची गुणवत्ता चांगली दिसून येते. फळाची गुणवत्ता चांगली मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या फळाला दर देखील चांगला मिळतो. या फळाच्या गुणवत्तेमुळे आणि मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढ होण्यास मदत होते.

20250413 204808

अनेक शेतकऱ्यांना क्रॉप कव्हर (Crop cover) पूर्वी मिळणारे उत्पन्न आणि क्रॉप कव्हर वापरल्यानंतर मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचे दिसून आले. या क्रॉप कव्हरच्या माध्यमातून फळबागाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या क्रॉप कव्हर मुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे संरक्षण होते. ज्यामध्ये फळबागावर येणारे विविध रोग, ऊन, धूळ, जंतू, कीटक यापासून फळबागाचे संरक्षण होते. फळबागांचे संरक्षण झाल्यामुळे फळांच्या संख्या आणि गुणवत्तेत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देखील मोठ्या प्रमाणावर होतो.Crop cover

1 thought on “Crop cover: फळबागाच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर चे फायदे!! उत्पन्नात होणार वाढ…”

Leave a comment