ड्रॅगन फ्रुट अनुदान किती दिले जाते, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. Dragon fruit anudan

Dragon fruit anudan मागील 10 ते 15 वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट उत्पादन घेण्यास सुरुवात केलेली आहे. राज्यातील शेतकरी ड्रॅगन फ्रुट या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत. हे फळ अनेक आजारांवर व त्वचेसाठी गुणकारी आहे. त्यामुळे या फळाला खूप सारी मागणी आहे . महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मागील 10 ते 15 वर्षापासून शेती करत आहेत.

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील ड्रॅगन फ्रुट शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ड्रॅगन फ्रुट शेती करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ड्रॅगन फ्रुट या पिकासाठी किती अनुदान दिले जाते, कोणकोणती कागदपत्रे लागतात, कसा करायचा, याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.

ड्रॅगन फ्रुट या पिकासाठी अनुदान Dragon fruit anudan

ज्या शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट या पिकाची लागवड करायची आहे त्यांना सरकारकडून ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी हेक्टरी 1 लाख 60 हजार रुपयांच अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ड्रॅगन फ्रुट या पिकाच्या लागवडीसाठी अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

Dragon fruit anudan किती अनुदान दिले जाणार

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट या पिकाच्या लागवडीसाठी एक हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी 4 लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे.त्यापैकी 40 टक्के रक्कम म्हणजे 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यात दिले जाणार आहे. ड्रॅगन फ्रुट अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

ड्रॅगन फ्रुटसाठी अनुदान किती टप्प्यात दिले जाणार

एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान तीन टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये60 टक्के म्हणजे 96 हजार रुपये दिले जाणार आहेत. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात 20 टक्के अनुदान दिले जाईल.

ड्रॅगन फ्रुट अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • 8 अ चा उतारा
  • आधार कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • बँक पासबुक
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर 0.20 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत

  • ड्रॅगन फ्रुट अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल.
  • त्यानंतर लॉगिन टॅब वर क्लिक करा.
  • सुरुवातीला आपले युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागतो , किंवा आयडी पासवर्ड तयार असेल तर डायरेक्ट लॉगिन करू शकतात.
  • त्यानंतर नवीन अर्ज टॅब वर क्लिक करा.
  • अर्ज टॅब वर क्लिक केल्यानंतर अभियान या टॅब वर क्लिक करा.
  • आता त्यानंतर ड्रॅगन फ्रुट लागवड या योजनेवर क्लिक करा.
  • आणि सर्व विचारलेली माहिती व्यवस्थित भरा व सबमिट या पर्यावर क्लिक करा अशा पद्धतीने ड्रॅगन फ्रुट अनुदान योजनेचा अर्ज तुम्ही भरू शकाल.

अर्ज छाननी प्रक्रिया

ड्रॅगन फ्रुट अनुदान योजनेचा अर्ज केल्यानंतर महाडीबीटीच्या अधिकाऱ्याकडून अर्जाची पडताळणी केली जाते. अर्जाची पडताळणी केल्यानंतर अर्जदार व्यक्तीच्या मोबाईलवर अर्ज मंजूर झाला आहे असा मेसेज येतो , अर्ज मंजूर झाल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. म्हणजेच जमिनीचा सातबारा आठ, बँक पासबुक, आधार कार्ड, घोषणापत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
त्याबरोबरच ड्रॅगन फ्रुट चीरोपे खरेदी केलेले ऑनलाईन बीलअपलोड करायचे आहे. सुरुवातीला हे बिल शेतकऱ्यांना स्वतःलाच भरून रुपये खरेदी करावे लागणार आहे. त्यानंतर जीएसटी बिल ऑनलाईन सादर करायचे आहे. ही सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर अनुदान जमा होईल.

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

ड्रगण फ्रूट अनुदान बद्दल अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

Leave a comment