E – Peek Pahani खरीप हंगामातील ई – पीक पाहणी 69 टक्के; इथून पुढे पाहणी तलाठी स्तरावर होणार

E – Peek Pahani : यंदाच्या तालुक्यातील खरीप हंगामात गत 23 सप्टेंबर पर्यंत 36 हजार 573 खातेदारानी एकूण 54 हजार 590 हेक्टर क्षेत्रातील ई – पीक पेरा पहाणी केली. त्याची टक्केवारी 69 आहे इथूनपुढील ई – पीक पाहणी तलाठी स्तरावर करण्यात येणार आहे. अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
E - Peek Pahani


तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 1 लाख 55 हजार 435 हेक्टर आहे. खरीप हंगामासाठी सर्वसाधारणप क्षेत्र 78 हजार 1 हेक्टर आहे . महसूल विभागाच्या नोंदणी नुसार यावर्षीच्या खरीप हंगामातील तालुक्यातील 9 महसूल मंडळातील 171 गावामध्ये 79 हजार 77 हेक्टरवर पीक पेरणी झालेली आहे.
त्यातील शेतकरी खातेदारांची संख्या एकूण 60 हजार 348 आहे. यानुसार शेवटची पीक पेरणी क्षेत्र व ई – पिक पाहणी क्षेत्रामध्ये 24 हजार 486 हेक्टरचा एवढा फरक आहे.

E – Peek Pahani खरीप हंगामातील करण्यापासून वंचित

ई – पीक पाहणी करण्यासाठी 23 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली होती. परंतु मुदत संपल्यामुळे 23 हजार 775 शेतकरी खातेदारांची वैयक्तिकरित्या ई – पीक पाहणी करायची राहून गेली आहे.राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी पेरलेल्या पिकांचा पेरा ई – पिक पाहणी ॲपवर नोंदविणे गरजेचे आहे. यावर्षी मान्सूम लेट झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या जुलै च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत रखडल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा ई – पीक पेरा नोंदविण्यास उशीर झाला. ई – पिक ॲपच्या वापराबद्दल कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाने पुरेशी माहिती देऊन सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना ई – पीक पाहणीचे अजून पण महत्व समजले नाही. खरीप हंगामातील 2024 – 25 मधील पीक पाहणी नोंदविण्यासाठी महसूल विभागाने 1 ऑगस्ट पासून सुरुवात केली होती. परंतु; शेतकऱ्यांना सतत च्या इतर तांत्रिक अडचणीमुळे , शासकीय सुट्ट्या, अवकाळी पाऊस अशा विविध कारणामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची ई – पीक पाहणी करण्यात आली नाही. आणि यातच 15 सप्टेंबर ई -पिक पाहणी करण्याची शेवटची तारीख निघून गेली आणि राज्यातील बरेच शेतकरी ई – पीक पाहणी करण्यापासून वंचित राहिले.

बांधकाम कामगारांना मिळणारा आता 10,000 हजार रुपये आणि भांडी किट मोफत

E – Peek Pahani राहून गेलेले शेतकरी लाभापासून वंचित

राज्यातील शेतकऱ्यांची 31 टक्के पेरणी क्षेत्राची ई – पीक पाहणी करायची राहून गेली आहे. म्हणजेच 23 हजार 775 शेतकऱ्यांनी आपल्या पेरलेल्या पिकांची नोंद मोबाईल मध्ये ॲप द्वारे ई – पीक पाहणी केलेली नाही, अशे शेतकरी आपल्या पिकाची झालेली नुकसान भरपाई मदत व किमान आधारभूत किमतीनुसार खरेदीचा लाभ घेणे अवघड जाणार आहे.

23 ऑक्टोबर पर्यंतE – Peek Pahani

ई – पीक पाहणी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने यापुढील पिक पाहण्याची मुदत वाढ तलाठी स्तरावर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आता तलाठी स्तरावरील ई – पिक पाहणी तपासणीची मुदत वाढ दिली आहे. आता 24 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत सहाय्यक आणि तलाठी आपल्या पिकाची ई – पीक पाहणी करू शकतील.

विशेष मोहीम राबवली

अनेक भागांमध्ये शेतामध्ये इंटरनेट मिळत नव्हते. तसेच सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई- पीक पाहणी प्रक्रिया वेगाने होत नव्हती. तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी करता येत नाही. यामुळे जिल्हा प्रशास नाकडून प्रत्येक गावातील 200 शेतकऱ्यांची ई – पीक पाहणी नोंदणी करण्याचे उद्दिष्टे ठेवून विशेष मोहीम राबवण्यात आली.

1 thought on “E – Peek Pahani खरीप हंगामातील ई – पीक पाहणी 69 टक्के; इथून पुढे पाहणी तलाठी स्तरावर होणार”

Leave a comment