E-Pik Pahani (DCS) 2024: तुमच्या मोबाईल मध्ये डीसीएस ॲपच्या माध्यमातून करा ई-पिक पाहणी.

E-Pik Pahani (DCS) 2024 : राज्यामध्ये ऑगस्ट 2024 पासून ई-पीक पाहणी (DCS) वर्जन 3.0.2 या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी न केल्यास पीक विमा आणि शासकीय अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते . त्यामुळे शेतकऱ्यांनी ई – पिक पाणी करणे खूप महत्त्वाचे आहे.आज आपण या लेखामध्ये कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

E-Pik Pahani (DCS) 2024 ई-पीक पाहणी का करणे आवश्यक आहे?

  1. पिकांचा अंदाज:
    केंद्र व राज्य सरकारांना शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले आहे आणि किती क्षेत्रावर पेरणी केली आहे, याचा अचूक अंदाज लावण्यासाठी ई-पीक पाहणी उपयुक्त ठरते.
  2. पीक विमा व अनुदान:
    शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या माहितीच्या आधारेच पीक विमा आणि शासकीय अनुदान दिले जाईल. नोंदणी न केल्यास तुमचे क्षेत्र ‘पडीत’ म्हणून घोषित होईल, व त्यामुळे अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

ॲप्लिकेशन डाउनलोड कसे करावे?

E-Pik Pahani (DCS) 2024 नवीन ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी, खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करून ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. https://sarkarieyojana.com/e-pik-pahani-dcs-kharip-2024/

ई-पीक पाहणी कशी करावी?

  1. ॲप्लिकेशन उघडणे:
    ॲप उघडल्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडून पुढे जा.
  2. खातेदार लॉगिन:
    • मोबाईल क्रमांक नोंदवा.
    • नवीन खातेदार असल्यास नोंदणी करा.
    • खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून नाव शोधा आणि पुष्टी करा.
  3. पीक माहिती नोंदवणे:
    • “पीक माहिती नोंदवा” या पर्यायावर क्लिक करा.
    • पीकाचे नाव, पेरणी केलेले क्षेत्र, आणि इतर माहिती भरून पुष्टी करा.
  4. लोकेशन व छायाचित्र:
    • लोकेशन ऑन करा.
    • शेतीचे दोन फोटो घ्या आणि अपलोड करा.
  5. माहिती तपासणी:
    • भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून अंतिम पुष्टी करा.

नोंदणी केलेली माहिती कशी पहावी?

E-Pik Pahani (DCS) 2024 नोंदणी झाल्यानंतर “पीक माहिती पहा” या पर्यायावर क्लिक करून तुमची संपूर्ण नोंदवलेली माहिती तपासा. जर चुकीची माहिती भरली गेली असेल, तर 48 तासांच्या आत दुरुस्ती करता येते.

हे वाचा: ड्रोन अनुदान योजना

महत्त्वाची सूचना

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. यामुळे पीक विमा, अनुदान, आणि अन्य योजनांचा लाभ घेता येईल. माहिती अचूक भरण्याची खबरदारी घ्या आणि वेळेवर नोंदणी करा.

Leave a comment

Close Visit Batmya360