E- Pik Pahani : ई – पीक पाहणीच्या नियमात होणार बदल ! आता ड्रोनचा वापर केला जाणार

E- Pik Pahani : राज्य शासन भविष्यामध्ये ड्रोन च्या साह्याने ई – पीक पाहणी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा विचार करत आहे मात्र ही प्रक्रिया सध्या कृषी,पशुसंवर्धन आणि महसूल विभाग यांच्या एकत्रित प्रयत्न द्वारे राबवली जाणारे,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी झालेल्या विधानसभेत दिली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलस पाटील यांनी रब्बी हंगामातील ई- पीक पाहणी अत्यंत कमी प्रमाणात,फक्त 27 टक्केच झाल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता . ते म्हणाले की, बऱ्याच ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्यामुळे ई- पीक पाहणी (E- Pik Pahani) प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत .

परिणामी, शेतकऱ्यांना नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीचा लाभ मिळू शकणार नाही . तसेच त्याशिवाय, ई-पीक पाहणी ची जबाबदारी महसूल विभागाने ग्रामसेवक,अशा सेविका आणि कोतवालवर टाकली आहे .मात्र, ही जबाबदारी तलाठी आणि कृषी सहायकांवर द्यावी,अशी त्यांनी मागणी केली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana
E- Pik Pahani

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, कृषी सहाय्यका,पशुसंवर्धन आणि महसूल विभाग एकत्रितरित्या ई – पीक (E-Pik Pahani) पाहणीसाठी कार्यरत राहतील . या अगोदर सातबारा उताऱ्यावर पिक पाहण्याची नोंद नोंदवली जात होती , पण मात्र अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नोंदी घेतल्या जात होत्या .

ई पीक पाहणी मध्ये होणाऱ्या या चुकी टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्रुटी टाळता येऊ शकतात मात्र,तलाठ्याची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी संयुक्त यंत्रणा तयार करण्यात आली आहे . संपूर्ण प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी 90 टक्के नोंदणी पूर्ण झाल्यानंतर होऊ शकते .E- Pik Pahani

हे वाचा : बोगस पीक विमा अर्ज सुरूच : या जिल्ह्यात आणखीन सापडले बोगस अर्ज.

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

ड्रोन च्या साह्याने पिक पाहणी करण्याचे नियोजन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे नमूद केले की, ई- पिक पाहणी (E- Pik Pahani) प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात . काही भागांमध्ये पिक नसताना पण विमा काढण्याचे प्रकार समोर आले आहेत . सध्या डोंगरी भाग वगळता राज्यातील ९३ टक्के भागामध्ये इंटरनेट उपलब्ध आहे,त्यामुळे ई – पिक पाहणी अधिक अचूकपणे केली जाऊ शकते . यासाठी शासनाने ई – सॅकच्या माध्यमातून सॅटेलाइट इमेजरी विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे आणि ड्रोनच्या सहाय्यने पिक पाहणी करण्याचे नियोजन सुरू आहे .

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रोन च्या सहाय्याने ई पीक पाहणी केली जाणार आशिर माहिती दिली. परंतु ड्रोण च्या सहाय्याने कोणामार्फत व कशी ई पीक पाहणी केली जाणार याची सविस्तर माहिती देलेली नाही. ई पीक पाहणी करण्यासाठी ड्रोन ची मदत घेतली जाणार ही प्रक्रिया कोणत्या प्रकारे राबवली जाणार याची स्पष्टता ही पुढील हंगामात ई पीक पाहणी करताना किंवा सरकार कडून स्पष्टता मिळाल्या नंतर स्पष्ट होईल.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत

राज्य सरकार हे शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यास कटिबुद्ध आहे तसेच, पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना निश्चित मदत दिली जाईल . असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले, तसेच ई- पिक पाहणी मध्ये 

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत केली जाईल . दरम्यान, काही सीएससी चालकांनी पीक विम्यासंबंधी गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले असून, अशा केंद्रांवर योग्य ती कारवाई करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. E- Pik Pahani

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

Leave a comment