farmer anudan राज्यात खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 26 लाख 48 हजार शेतकऱ्यांसाठी 2920 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जाहीर करण्यात आला असून जिल्हानिहाय मंजूर रक्कम आणि शेतकऱ्यांची संख्या स्पष्ट करण्यात आली आहे.
farmer anudan अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान
2024 मध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने या नुकसानीची पाहणी करून 2920 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हानिहाय नुकसान भरपाईचे वितरण
राज्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी मंजूर भरपाईचा तपशील पुढीलप्रमाणे: farmer anudan
- जालना: 2,82,538 शेतकऱ्यांसाठी 412.30 कोटी रुपये
- हिंगोली: 29,679 शेतकऱ्यांसाठी 419.48 कोटी रुपये
- नांदेड: 7,83,915 शेतकऱ्यांसाठी 812.38 कोटी रुपये
- बीड: 56,214 शेतकऱ्यांसाठी 520.94 कोटी रुपये
- धाराशिव: 1,80,786 शेतकऱ्यांसाठी 221.81 कोटी रुपये
- छत्रपती संभाजीनगर: 25,747 शेतकऱ्यांसाठी 234.20 कोटी रुपये
- परभणी जिल्हा: 10,991 शेतकऱ्यांसाठी 10.08 कोटी रुपये (14 ऑक्टोबर 2024 च्या प्रस्तावानुसार)
- हिंगोली जिल्हा: 7707 शेतकऱ्यांसाठी 4.56 कोटी रुपये
- नांदेड जिल्हा: 552 शेतकऱ्यांसाठी 70 लाख रुपये
- बीड जिल्हा: 10 शेतकऱ्यांसाठी 2.81 लाख रुपये
- लातूर जिल्हा: 81966 शेतकऱ्यांसाठी 78.41 कोटी रुपये (यापूर्वी 348 कोटी मंजूर)
- जून 2024 मधील नुकसान: 460 शेतकऱ्यांसाठी 9.79 लाख रुपये
विभागातील नुकसान भरपाई
नागपूर विभाग:
- वर्धा: 1,605 शेतकऱ्यांसाठी 2.83 कोटी रुपये
- नागपूर: 28,604 शेतकऱ्यांसाठी 64.41 कोटी रुपये
- गोंदिया: 27,012 शेतकऱ्यांसाठी 26.29 कोटी रुपये
- भंडारा : 8,497 शेतकऱ्यांसाठी 10.02 कोटी रुपये
- गडचिरोली : 3,952 शेतकऱ्यांसाठी 3.27 कोटी रुपये
- चंद्रपूर : 851 शेतकऱ्यांसाठी 82 लाख रुपये
नाशिक विभाग:
- नाशिक: 331 शेतकऱ्यांसाठी 21 लाख रुपये
- धुळे: 148 शेतकऱ्यांसाठी 18 लाख रुपये
- नंदुरबार: 527 शेतकऱ्यांसाठी 41 लाख रुपये
- जळगाव : 5731 शेतकऱ्यांसाठी 5.71 कोटी रुपये
- अहमदनगर : 5749 शेतकऱ्यांसाठी 2.40 कोटी रुपये
पुणे विभाग:
- सातारा: 400 शेतकऱ्यांसाठी 10.73 लाख रुपये
- सोलापूर: 3747 शेतकऱ्यांसाठी 58.01 कोटी रुपये
- सांगली: 5153 शेतकऱ्यांसाठी 3.48 कोटी रुपये
मंजूर रक्कम आणि पुढील पावले
farmer anudan एकूण 26 लाख 48247 शेतकऱ्यांसाठी 2920 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय, केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.
शेतकऱ्यांना थेट लाभ
शासनाने ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल .
शेतकऱ्यांसाठी दिलासा
farmer anudan या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शासनाने यापूर्वी 1600 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली होती. आता मंजूर रक्कम सुमारे 4500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
शेतकऱ्यांनी या निर्णयाचा लाभ घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रे आणि (KYC) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावीत.
हे वाचा: विमा अर्जाची होणार तपासणी.
1 thought on “नुकसान भरपाईसाठी 2920 कोटी रुपये मंजूर, 26 लाख 48 हजार शेतकऱ्यांना लाभ.”