Farmer Digital Card : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सुमारे 50% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शेती अधिक विकसित करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे विविध योजना राबवत असतात. अशाच एका महत्त्वाकांक्षी निर्णयाअंतर्गत, मोदी सरकारने आता देशातील प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल ओळखपत्र देण्याची घोषणा केली आहे. तर आजच्या आपण या लेखांमध्ये याचे फायदे काय? हा डिजिटल आयडी कार्ड कशासाठी असतो, यासाठी रजिस्ट्रेशन कुठे आणि कसं करायचं ? याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
काय आहे डिजिटल आयडी कार्ड (Farmer Digital Card)?
डिजिटल आयडी कार्ड हे शेतकऱ्यांसाठी विशेष ओळखपत्र असेल. या कार्डवर युनिक 12 अंकी क्रमांक देण्यात येणार आहे . या 12 अंकी क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांचा वैयक्तिक डेटा तयार केला जाईल. यात जमिनीची माहिती, शेतीची माहिती, आणि शेतकऱ्याचा सरकारी योजनांशी असलेला संबंधही समाविष्ट असेल.
या डिजिटल कार्डचा उपयोग काय?
- सरकारी योजनांचा थेट लाभ:
शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी, आरोग्य योजना यांसारख्या योजनांचा फायदा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या नोंदणी प्रक्रियेतून जावे लागते. मात्र, डिजिटल आयडी कार्डमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचा डेटा तयार केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे. - अनुदान थेट खात्यात:
या डिजिटल आयडी कार्डमुळे शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. यामुळे योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल. - डेटाची एकत्रित नोंद:
देशातील 11 कोटी शेतकऱ्यांचा डेटा डिजिटल पद्धतीने तयार केला जाणार आहे. या डेटाचा वापर विविध धोरणे आखण्यासाठी आणि योजनांचे नियोजन करण्यासाठी होईल. - कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग:
डिजिटल कार्डमुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बाजारभाव, कृषी सल्ला यांसारख्या सुविधा एका क्लिकवर मिळतील. - कागदपत्रांची गरज नाही:
आता शेतकऱ्यांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये कागदपत्रे सादर करण्याची गरज उरणार नाही. कारण सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असेल.
हे वाचा: शेतकरी युनिक आयडी कार्ड
रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी असेल?
Farmer Digital Card डिजिटल आयडी कार्डसाठी नोंदणी प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन स्वरूपात असेल. कृषी खात्याने याबाबत माहिती देण्यासाठी पत्रक काढले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा ऑनलाइन पोर्टलवर जाऊन नोंदणी करता येईल.
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय का महत्त्वाचा?
डिजिटल आयडीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ आणि सेवा वेळेत मिळतील. तसेच, सरकारी योजनांमध्ये अधिक पारदर्शकता येईल. कृषी क्षेत्राला डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी हा मोठा निर्णय ठरेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सज्ज व्हावे.Farmer Digital Card