शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ड्रोन; ऑनलाइन अर्ज सुरू. Farmer drone anudan.

FARMER DRONE ANUDAN केंद्र सरकारने 2020-21 मध्ये शेती उपयोगी ड्रोनसाठी अनुदान देण्याची घोषणा केली. या माध्यमातून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात होते, तसेच कृषी पदवीधारक व शेतकरी उत्पादक संस्था यांना या योजनेतून लाभ दिला जात होता. परंतु ही अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असल्यामुळे यामध्ये खूप कमी प्रमाणात शेतकरी अर्ज दाखल करत होते. यामुळे आता शेती उपयोगी ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळणे या घटकाकरिता ऑनलाईन अर्ज सुरू केले आहे. ड्रोन अनुदान साठी ऑनलाईन अर्ज कोठे करावा. त्यासोबतच यासाठी कोणते कागदपत्रे लागतात आणि यासाठी कोण पात्र असणार किती अनुदान वितरित केले जाणार याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.

ड्रोनसाठी किती अनुदान वितरित केले जाते

FARMER DRONE ANUDAN शेती उपयोगासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे ड्रोन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदानित केले जातात हे अनुदान कोणाला किती दिले जातं याची माहिती पाहूया.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
  • कृषि पदवीधारक यांना ड्रोन खरेदीसाठी 50 टक्के अनुदान वितरित केलं जातं. जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंत हे अनुदान वितरित केलं जातं.
  • शेतकरी उत्पादक संस्था यांना ड्रोन खरेदीसाठी 75 टक्के अनुदान वितरित केलं जातं.

अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सातबारा
  • आठ अ
  • बँक पासबुक
  • मोबाईल क्रमांक

हे वाचा: बचत गटातील महिलांसाठी ड्रोन दिदी योजना

हे पण वाचा:
PM Kisan Yojana
PM Kisan Yojana :पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या हप्त्यासाठी नवीन अट! हे महत्त्वाचे डॉक्युमेंट नसेल तर मिळणार नाही 2000 रुपयांचा लाभ..!

FARMER DRONE ANUDAN अर्ज कसा करावा.

ड्रोन अनुदानासाठी अर्ज आता महाडीबीटी या पोर्टलवर उपलब्ध झाला आहे. ज्या शेतकऱ्यांना या घटकासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन आपला अर्ज सादर करावा. अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहून आपण संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ड्रोन निवड कशी होणार.

डीबीटी चे अंतर्गत ड्रोन अनुदानासाठी अर्ज केले शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक संस्थांना अनुदान वाटपासाठी व निवड प्रक्रियेसाठी लॉटरी पद्धत राबवली जाणार आहे. या लॉटरी पद्धतीच्या माध्यमातून पात्र झालेल्या अर्जातून ठराविक अर्जदारांची निवड केली जाईल. व या अर्जदारांना पुढील कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातील त्यासोबतच ड्रोन खरेदी करण्यासाठीची परवानगी देखील दिली जाईल.

निवड झाल्यानंतर कोणती कागदपत्रे आवश्यक लागतील

हे पण वाचा:
PM E-Drive Scheme PM E-Drive Scheme: इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना …आता फक्त 5 दिवसात मिळणार अनुदान! असा करा अर्ज…

FARMER DRONE ANUDAN ड्रोन अनुदान अर्ज करण्यासाठी काही विशेष कागदपत्र लागत नाहीत; परंतु निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्या ड्रोनचे कोटेशन त्यासोबतच ड्रोन चा टेस्ट रिपोर्ट, ट्रेनिंग घेतलेले प्रमाणपत्र, शेतकरी उत्पादक संस्था असेल त्या संस्थेचे प्रमाणपत्र किंवा कृषी पदवीधारक असेल तर पदवी प्रमाणपत्र या प्रकारची कागदपत्रे निवड झाल्यानंतर आपल्याला पोर्टलवर अपलोड करावी लागतील.

Leave a comment

Close VISIT MN CORNERS