Farmer ID :ऍग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन!

Farmer ID : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने आणि परिणाम कारकरीत्या लाभ घेणे, शेतकऱ्यांना देणे अत्यंत सोप्या पद्धतीने व्हावे, यासाठी केंद्र शासनामार्फत ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी भुसावळ तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी भुसावळ तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी,कृषी सहाय्यक व सेवा केंद्र चालक;उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या कार्यालय येथे बैठक घेऊन प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता .

Farmer ID

फार्मर आयडी फार्मर आयडीचे फायदे

शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा जलद आणि सोप्या पद्धतीने लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाने अ‍ॅग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी (Farmer ID) दिले . जे शेतकरी फार्मर आयडी तयार करून घेणार आहे त्या शेतकऱ्यांना आता इथून पुढे शासनाच्या विविध योजनेचा लाभ जलद गतीने मिळणार आहे ,जसे की,पीएम किसान सन्मान योजना,पिक विमा योजना,तसेच पीक कर्ज,नुकसान भरपाई अनुदान DBT द्वारे वाटप, तसेच हवामान डेटा, मृदा आरोग्य माहिती तसेच, वेगवेगळ्या पिकांबद्दल सल्ला शासनाच्या विविध योजनेचा लाभ या फार्मर आयडी मध्ये समावेश आहे.

हे वाचा : सोयाबीन ,कापूस आणि कांदा काय आहे बाजार भाव, जाणून घ्या सविस्तर

Farmer ID तयार करण्याचे आवाहन

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करून घ्यावी असे आवाहन भुसावळचे तहसीलदार यांच्याकडून करण्यात आले आहे .या योजनेअंतर्गत, भुसावळ तालुक्यात एकूण 25 ,400 खातेदार शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आयडी तयार करून घ्यावे .

फार्मर आयडी कसा तयार करावा?

फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना आधारकार्ड आणि आधारकार्डाशी संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहेत. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना गावातील तलाठी, महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र किंवा CSC चालक यांच्याकडून शेतकरी यांची नोंदणी करुन घ्यावी.

Farmer ID विशेष शिबिरे आयोजित केली आहेत

21 जानेवारी 2025 पासून, सर्व गावांमध्ये कॅम्पमोड शिबीरे आयोजित करण्यात आलेली आहेत. या शिबिरांमध्ये शेतकऱ्यांना फार्मर (Farmer ID) आयडीसाठी नोंदणी करण्याची सुविधा मिळणार आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यावा आणि फार्मर आयडी लवकरात लवकर तयार करावा, असे भुसावळ तहसिलदारांनी आवाहन केले आहे.

Farmer ID महत्त्वाचे आवाहन

शेतकऱ्यांनी आपल्या नोंदणीसाठी यापूर्वी दिलेल्या माहितीचा उपयोग करून शिबिरांमध्ये सहभागी होऊन फार्मर आयडी मिळवावा. यामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ जलदगतीने मिळेल.Farmer ID

1 thought on “Farmer ID :ऍग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन!”

Leave a comment

Close Visit Batmya360