Farmer ID : डिजिटल कृषी मिशनच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना कर्ज, हमीभाव खरेदी, नुकसान भरपाई यासारख्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध होव्यात यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येणार आहे. राज्य सरकारला भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या मजुरांचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत,अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 18 मार्च रोजी संसदेत दिली .

कृषिमंत्री यांनी सभागृहात दिली माहिती
भाजप खासदार डॉ .पुरंडेस्वारी यांनी शेतमजुरांना फार्मर (Farmer ID) आयडी देणार का ? असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता . त्यावर कृषीमंत्री चौहान यांनी सभागृहात माहिती दिली .कृषिमंत्री म्हणाले, दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यांचे ओळखपत्र तयार करण्यासाठी एफपीओ आणि कृषी सखी योजनेची मदत घेता येऊ शकते . त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येईल . तसेच या व्यतिरिक्त भाडे तत्वावर शेती कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना पण फार्मर आयडी देण्यात येणार ते शेतकरी पण या आयडीच्या लाभापासून वंचित राहणार नाही .अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिले .
हे वाचा : शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय
शेतमजूर,बटाईदार,भाडेतत्त्वार शेती करणाऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येणार का?
कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले ,यापूर्वी केवळ जमिनधारक शेतकऱ्यांनाच फार्मर आयडी (Farmer ID) देण्यात येत होते. मात्र, केंद्र सरकारने राज्य सरकारला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, भाडेतत्वावर शेती करणारे, बटाईदार आणि शेतमजूर यांनाही या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे शेती संबंधित सर्व योजनांचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला पूर्णत मदत करेल. असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं आहे.
केंद्र सरकार राज्य सरकारला एका फार्मर आयडी साठी किती रुपये ?
कोणताही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला एका फार्मर (Farmer ID) आयडी साठी 15 रुपये देते .तसेच, राज्य सरकारला शेतकरी ओळखपत्र नोंदणी शिबिर आयोजितकरण्यासाठी 15 हजार रुपये दिले जातात,अशी माहिती कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली .
फार्मर आयडी चे फायदे काय
शासनाकडून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अडचणी येत होत्या .कारण की, सरकारकडे खात्रीपूर्वक डेटा नव्हता .मात्र आता,शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र (Farmer ID) देण्यात येणार आहे. या फार्मर आयडीमुळे अर्ध्या तासात शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे ,तसेच शेतीमाल विक्रीसाठी कोणत्याही कागदपत्रविना शेतकरी त्यांच्या शेतीमालाची विक्री करून शकतात, तसेच पीक लागवडीखालील क्षेत्राची माहिती आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वेळेवर मिळेल . असे कृषिमंत्री म्हणाले .
शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी ॲग्री स्टॉक योजना राबविण्यात येत आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना CSC सेंटरवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येणार आहे. राज्यामध्ये या योजनेचं नोंदणी करण्यास सुरू आहे.Farmer ID