Farmer ID सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र बनवून घेणे बंधनकारक! ही आहे अंतिम मुदत…

Farmer ID : केंद्र सरकारने शेतकरी ओळखपत्र नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक आयडी क्रमांक दिला जाणार आहे. सध्या शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी अर्ज करत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहे. त्यासाठी ॲग्री स्टॉक योजना सरकार राज्यात राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करणे बंधनकारक आहे. Farmer ID

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Farmer ID

काय असणार आहे या शेतकरी ओळखपत्र मध्ये?

या शेतकरी (Farmer ID) ओळखपत्र मध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती जसे की (नाव, गाव, पत्ता) शेत जमिनीचा तपशील असणार आहे. शेत जमिनीचा तपशील मध्ये (सर्वे नंबर,खाते नंबर,जमिनीचे क्षेत्र इत्यादी) आणि शेतकऱ्यांना एक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे .

हे वाचा : शेतकरी कर्जमाफीबाबत रिझर्व्ह बँकेचे नवे दिशानिर्देश

शेतकऱ्यांना या ओळखपत्राचा कसा उपयोग होणार?

  • शेतकऱ्यांना या शेतकरी ओळखपत्राचा वापर करून अनेक शासकीय योजनेचा लाभ सहज घेता येणार आहे .
  • शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने पीक कर्ज मिळवता येणार आहे .
  • शेतकऱ्यांना किडा व रोगांच्या प्रादुर्भावाचा अंदाज हवामानाच्या आधारे समजून घेता येणार आहे .
  • शेतकरी ओळखपत्रचा वापर मृदा आरोग्य बदल योग्य माहिती समजून घेता येणार आहे म्हणजे तुमच्या शेतातील माती कोणत्या पिकासाठी योग्य आहे ते समजून घेता येणार आहे .
  • शेतकऱ्यांना आता एकाच पर्यायांमध्ये अनेक सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मदत होणार आहे म्हणजे,शेतकऱ्यांना वेगवेगळी कागदपत्रे गोळा करायची गरज पडणार नाही .
  • पीएम किसान योजनेचा लाभ घेत असणाऱ्या शेतकऱ्यांना इथून पुढच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे . Farmer ID

शेतकरी ओळखपत्र साठी अर्ज कोठे करायचा

शेतकऱ्यांना फार्मर आयडी (Farmer ID) योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळील महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता .सरकारकडून 7/12 ला आधार लिंक करून शेतकरी ओळखपत्र बनवून घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे .त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी बनवून घेणे बंधनकारक आहे .

शेतकरी ओळखपत्र बनवून घेण्यासाठी ही आहे अंतिम मुदत

शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड हे शासकीय कामासाठी उपयोगी ठरणार आहे.शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.फार्मर आयडी बनवून घेण्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे मुदती अगोदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घ्यावे,जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे .

शेतकरी ओळखपत्र बंधनकारक अन्यथा विसरा शासकीय योजनेचा लाभ

शेतकऱ्यांना सरकारी योजनेसाठी फार्मर युनिक आयडी ॲग्रीस्टॉक बनवून घेणे आवश्यक आहे .केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांकडेशेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान,नमो शेतकरी योजना,पिक विमा योजना आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. Farmer ID

कोण कोणती कागदपत्रे आवश्यक

शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे आणि रेशन कार्ड घेऊन तुम्ही तुमच्या गावातील सीएससी सेंटर किंवा कॅम्पमध्ये जाऊन आपला 7/12 व आधार लिंक मोबाइल नंबर घेऊन शेतकरी ओळखपत्र तयार करून घ्यावा .यासाठी तुम्ही तलाठी ,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधू शकतात.

महत्वाची सूचना

फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च देण्यात आली आहे . त्या अगोदर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळील महा-ई-सेवा केंद्रात जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावा,जेणेकरून शेतकऱ्यांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ सहज मिळू शकेल. Farmer ID

Leave a comment

Close Visit Batmya360