Farmer ID : केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जातात. तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये या प्रमाणामध्ये दिले जातात.म्हणजेच या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे दिले जाते. केंद्र सरकार द्वारा चालवली जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजना ही कृषी मंत्रालयाकडून चालवली जाते. तर, नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून चालवली जाते.

राज्यामध्ये नमो शेतकरी महास्माननिधी ही योजना 2023-24 च्या अर्थसंकल्प पासून राबवण्यात आले आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 6 हप्ते पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आले आहे . तर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत .तर आता राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम जर सुरू ठेवायची असेल तर ॲग्री स्टॉक प्रकल्पांतर्गत फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढून घेणे बंधनकारक आहे.राज्यातील जे शेतकरी फार्मर आयडी काढणार नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद होऊ शकतो .त्यामुळे हा लाभ सुरळीत सुरू ठेवण्यासाठी फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे .Farmer ID
हे वाचा : केंद्र सरकारच्या उज्वला योजनेत मोठा बदल! एकाच कुटुंबातील 2 महिलांना मोफत गॅस कनेक्शन? पहा सविस्तर
शेतकरी ओळखपत्र साठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक
फार्मर आयडी (Farmer ID) म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे शेतकरी ओळखपत्र अनेक शेतकऱ्यांनी काढले आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजून काढली नाहीत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पहा.
- आधार कार्ड
- सातबारा उतारा गट क्रमांक
- नमुना 8 अ खाते उतारा क्रमांक
- मोबाईल क्रमांक
हे फार्मर आयडी काढण्यासाठी वरील कागदपत्रे आवश्यक लागतात फार्मर आयडी नोंदणी संदर्भात तुम्ही तलाठी कार्यालय,कृषी सहाय्यक आणि सीएससी केंद्र चालकांशी संपर्क साधू शकतात आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊ शकतात Farmer ID
आतापर्यंत नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेतून किती रुपये मिळाले?
राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6 व्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे .म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer ID) आतापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हजार रुपये देण्यात आले आहेत तर पी एम किसान योजनेअंतर्गत 19 हप्ते म्हणजेच 38000 रुपये देण्यात आले आहेत या दोन्ही योजनेअंतर्गत एकूण पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 देण्यात आले आहेत Farmer ID
ॲग्री स्टॉक योजना म्हणजे काय?
देशातील प्रत्येक नागरिकांना जसे आधार क्रमांक दिलेला आहे त्याचप्रमाणे आता ॲग्री स्टॉक प्रकल्पाची रचना आहे .हे आयडी कार्ड शेतकऱ्यांचा एक युनिक आयडी असेल शेतकऱ्यांची जिथं शेती असेल त्याचा फार्मर आयडी असेल .या फार्मर आयडी मध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती आणि फार्मर आयडीचं (Farmer ID) रेकॉर्ड तयार केलं जाईल फार्मर आयडी हे शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक केल्यानंतर पिक विमा आणि पीक कर्ज या संदर्भातील मंजुरीची कामे डिजिटल पद्धतीने आणि जलदगतीने पूर्ण होणार आहेत .या सर्व सुविधा शेतकऱ्यांना प्रकल्पाद्वारे उपलब्ध होणार आहेत .आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढली नाही त्यांनी लवकरात लवकर काढून घेणे आवश्यक आहे Farmer ID
1 thought on “Farmer ID नमो शेतकरी आणि पीएम किसान च्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक….!”