GST on UPI Payments :2000 रुपयांपेक्षा जास्त UPI Payment व्यवहारावर खरंच GST भरावी लागणार का ?पहा सविस्तर….

GST on UPI Payments : सध्याच्या काळा किराणा असो किंवा सोने चांदी विकत घेणे आता प्रत्येक नागरिका आपला स्मार्टफोन काढून एक बार कोड स्कॅन करून पेमेंट करत असताना दिसतात. युनिफाइड पेमेंट इंटरफेसच्या सुविधेमुळे सध्या नागरिकांची व्यवहार करण्याची पद्धत बदलली आहे .मागील महिन्यामध्ये 24.77 लाख कोटी रुपयाचे यूपीआय व्यवहार झाले होते .अशा मध्येच आता सध्या सोशल मीडियावर एक चर्चा होत असताना पाहायला मिळत आहे ती चर्चा म्हणजे केंद्र सरकार हे 2 हजार रुपये पेक्षा जास्त व्यवहारावर जीएसटी लावणार असल्याची चर्चा होत आहे .पण मात्र आता याबाबत सरकारने स्पष्ट माहिती दिली आहे .GST on UPI Payments

GST on UPI Payments

यूपीआय व्यवहार जीएसटी च्या कक्षेत

मागील काही काळापासून,यूपीआय व्यवहार जीएसटीच्या कक्षेत आणले जाऊ शकतात अशा न्यूज येत आहेत.या न्यूज मध्ये 2 हजार रुपये पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारावर 18 टक्के जीएसटी आकारला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे .गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर 2000 रुपयापेक्षा जास्त किमतीच्या यूपीआय व्यवहारावर 18% जीएसटी आकारला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे .याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती .पण जर असं झालं तर नागरिक यूपीआय वापरणे सोडून देतील आणि परत पुन्हा रोख रकमेकडे वळतील अशी पण चर्चा सुरू आहे.

हे वाचा : फोन पे,गुगल पे,पेटीएम का झाले बंद? npci ने सांगितले कारण…

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सरकारने दिली स्पष्ट माहिती

मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चा मुळे नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.पण आता अशातच व्यवहार जीएसटी च्या कक्षेत आणण्याचा दावा केंद्र सरकारने फेटळून लावला आहे . तर सोशल मीडियावर येत असणारे व्हिडिओ आणि वृत्त पूर्ण खोटे दिशाभूल करणारे आहेत ,असे सरकारने स्पष्ट म्हटले आहे . याबाबत अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले की,असा कोणताही सरकारचा प्रस्ताव नाही. त्यामुळे केंद्र सरकार 2000 रुपयापेक्षा जास्त किमतीच्या यूपीआय व्यवहारावर कोणताही जीएसटी आकारला जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे .

जीएसटी फक्त पेमेंट गेटवे किंवा इतर माध्यमातून आकारला जाणाऱ्या सेवा शुल्काशी जोडलेल्या शुल्कावरच आकारला जातो .जानेवारी 2020 पासून,केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांने सर्वसामान्य नागरिक ते व्यापारी यूपीआय व्यवहारावरील एमडीआर रद्द करण्यात आला आहे,मग याचा अर्थ असा की,यूपीआय पेमेंट वर कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जात नाही.त्यामुळे जीएसटी आकारण्याचा प्रश्नच येत नाही.स्पष्टीकरण अर्थमंत्र्याकडून देण्यात आले आहे. GST on UPI Payments

सरकारचे उद्दिष्ट

डिजिटल पेमेंट आणि यूपीआयला प्रोत्साहन करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहेत .यामुळे 2021 22 पासून यूपीआय प्रोत्साहन योजना लागू केली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकते व्यापारी व्यवहारांना प्रोत्साहन देते,असे अर्थमंत्र्यांने म्हटले आहे . GST on UPI Payments

Leave a comment

Close VISIT MN CORNERS