farmer loan waver मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागच्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 7 लाख पात्र शेतकरी मागील आठ वर्षापासून कर्जमाफीच्या लाभापासून राहून गेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी सर्व अटी पोर्तुता करूनही फक्त सरकारच्या कथित तांत्रिक अडचणीमुळे या शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा निवडून आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना म्हणजे आर्थिक संकटातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. सरकारने यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून, अनेक घोषणा देखील केल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत.
शेतकरी कर्जमाफीचे ऐतिहासिक पार्श्वभूमी
farmer loan waver राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी 13 दिवसांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ राबवण्यात आली . या योजनेतून 1 एप्रिल 2001 पासून ते 30 जून 2016 या काळातील शेतकऱ्यांची दीड लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्यात आले होते.
तसेच दीड लाखाच्या वरील कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड म्हणजेच या योजनेनुसार जर शेतकऱ्यांनी दीड लाखाच्या वरचे कर्ज भरल्यास सरकार लगेच दीड लाख रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करणार होते. त्यावेळी 2015-16 आणि 2016-17 या दोन वर्षात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले. राज्यातील योजनेसाठी 50.60 लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र, आजही 7 लाख शेतकरी या लाभांपासून वंचित आहेत.
शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित
farmer loan waver राज्यातील 50.60 लाख शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेले असतानाही कर्ज माफी पोटी शासनावर 24 हजार 737 कोटीचा आर्थिक बोजा पडणार होता. यापैकी मागील आठ वर्षात 24.88 लाख शेतकऱ्यांना 13 हजार 705 कोटीची कर्जमाफी देण्यात आली होती, त्यातील एक रकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत 4.27 लाख शेतकऱ्यांना 2 हजार 630 कोटीचा लाभ मिळाला. पण मात्र, 6.56 लाख लाडका शेतकरी अजूनही 5 हजार 975 कोटीच्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत.
कर्जमाफी योजनांची सध्यस्थिती
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ आणि महाविकास आघाडी सरकारची ‘महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना’ यांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा होता. मात्र या योजनांच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक अडचणी व प्रशासनातील घोळामुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.
तांत्रिक अडचणींमुळे योजना रखडल्या
farmer loan waver दोन्ही कर्जमाफी योजनेत समावेश असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारच्या सर्व अटीची पूर्तता केली आहे. त्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. पण मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारच्या ‘महा ऑनलाईन’ आणि ‘महा आयटी’ या दोन तंत्रज्ञान कंपन्यांकडून आवश्यक तपशील वेळेवर उपलब्ध होत नसल्याने लाखो शेतकरी गेल्या 8 वर्षांपासून कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. सहकार विभागाकडे अंमलबजावणीची जबाबदारी असली तरी, तांत्रिक त्रुटींमुळे योजनांची अंमलबजावणी सुरळीत होत नाही.
हे वाचा: शेतकरी कर्ज माफी कधी कृषि मंत्र्याने दिली सर्व माहिती
शेतकऱ्यांच्या मागण्या
अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या मते, प्रशासनाच्या त्रुटींमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. फडणवीस सरकारने या प्रश्नात लक्ष घालून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी.
सहकारमंत्र्यांची आश्वासने
farmer loan waver सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी या विषयावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे की, एकही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असे ते म्हणाले.
farmer loan waver निष्कर्ष
कर्जमाफी योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, प्रशासनातील त्रुटी व तांत्रिक अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास कमी होत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
1 thought on “शेतकरी कर्जमाफीपासून वंचित! पात्र असतानाही 7 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही लाभ. farmer loan waver”