याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर: free gas cylinder for women

free gas cylinder for women: महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली या योजनेसोबतच आणखी एक महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना. अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार. आता याकरिता कोणत्या महिला पात्र असणार आणि कोणाला लाभ मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

अन्नपूर्णा योजनेसाठी या महिला पात्र.

उज्वला योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिला यांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. याच महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. जर महिलेणे उज्ज्वला योजनेतून लाभ घेतला नसेल व माझी लाडकी बहीण योजनेची पात्र लाभार्थी नसेल तर त्या महिलेला अन्नपूर्णा योजनेतून लाभ दिला जाणार नाही. गॅस कनेक्शन कसे ट्रान्सफर करावे या बद्दल अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

free gas cylinder for women किती मिळणार लाभ

अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. परंतु या महिलांना किती लाभ मिळणार याबद्दलची बऱ्याच महिलांना माहिती नाही. तर शासनाकडून पात्र असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर चे अनुदान बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. ही रक्कम 830 रुपये या प्रमाणात महिलांच्या बँक खात्यावर डीबीटी अंतर्गत जमा केली जाणार आहे.

लाभ मिळत नसेल तर काय करावे.

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत ज्या महिलांना किंवा ज्या कुटुंबांना लाभ मिळत नाही त्यांनी आपले कनेक्शन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलेच्या नावावर करणे आवश्यक आहे. हे कनेक्शन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलेच्या नावावर असेल तरच त्या महिलेला शासनाकडून अन्नपूर्णा योजने अंतर्गत मिळणारा अनुदान लाभ वितरित केला जाईल.

ज्या महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर नाही किंवा कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर गॅस सिलेंडर आहे. त्या महिलांनी आपल्या कुटुंबातील गॅस कनेक्शन आपल्या नावावर करून घ्यावे. महिलेचे नावावर गॅस कनेक्शन केल्यानंतर महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.

बऱ्याच महिलां या योजनेत पात्र आहेत परंतु त्यांचे बँक खाते त्यांचा आधार कार्ड सोबत लिंक नाही या कारणामुळे देखील महिलांना या मोफत गॅस अनुदान योजनेचा लाभ मिळत नाही. ज्या महिलांना या प्रकारची अडचण निर्माण होत आहे त्या महिलांनि आपले बँक खाते आपल्या आधार सोबत लिंक करणे अवश्यक आहे.

1 thought on “याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर: free gas cylinder for women”

Leave a comment