gas connection transfer : असे करा पतीच्या नावावरून पत्नीच्या नावावर गॅस कनेक्शन.

gas connection transfer नवऱ्याच्या नावावरून बायकोच्या नावावर  गॅस कनेक्शन करणे ही जास्त अवघड प्रक्रिया नसली तरी त्यासाठी गॅस कंपनीच्या गरजेनुसार कागदपत्रे आणि प्रक्रिया कडे लक्ष देणे आवश्यक आहे. बदललेले राहिवाशी पत्ते, कौटुंबिक बदल किंवा इतर काही घटक संबंधित बदलामुळे हस्तांतरण होऊ शकते. या कारणामुळे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी के प्रक्रिया आहे या बाबतची माहिती आपण पाहुयात.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

गॅस कनेक्शन नाव हस्तातरण का आहे आवश्यक?

ट्रान्सफरसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनवरील नाव का बदलायचे आहे, हे आधी माहिती करून घेतले पाहिजे. पती-पत्नींपैकी एकाला आपले गॅस कनेक्शन आपल्या नावावर ठेवायचे असेल तर तो ते ट्रान्सफर करून घेण्यासाठी जातो आणि मग त्याच्या नावावर गॅस कनेक्शन नसल्याचे कळते. अनेकदा दाम्पत्य इतर ठिकाणी स्थलांतरित होते आणि पत्नी च घराची मुख्य रहिवासी बनते आणि त्या मुळे गॅस कनेक्शन बदली केले जाते. बऱ्याच वेळा सरकार कडून महिलेच्या नावावर असणाऱ्या कनेक्शन साठी सरकार कडून गॅस अनुदान वितरित केले जाते त्या साठी देखील गॅस कनेक्शन हस्तांतरित करणे अवश्यक असते.

त्या सोबतच सरकार कडून उज्ज्वला गॅस धारकांना सरकार कडून ३०० रुपये अनुदान वितरित केले जाते आणि आता राज्य सरकार ने देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत राज्यातील महिलांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे.

हे वाचा : अन्नपूर्णा योजना कोणाला मिळणार लाभ

आपल्या गॅस कंपनी ला काय हवे आहे?

आपल्या गॅस वितरकाकडे शक्यतो कनेक्शनच्या हस्तांतरणासाठी वेगळी आवश्यकता आणि प्रक्रिया असतात. पहिली पायरी म्हणजे आपल्या जवळील गॅस कंपनीच्या नियमांचे पालन करून आपलं आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करणे अवश्यक आहे.

गॅस कनेक्शन बदलण्यासाठी लागणारे कागदपत्र.

ओळखपत्र :  आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड  सारख्या सरकारी ओळखपत्रे आपल्याला आपली ओळख पटवण्याचा पुरावा देणे आवश्यक आहे.

पत्त्याचा पुरावा:  आपल्याला लाइट बिल, भाडे करार किंवा प्रॉपर्टी डीड द्वारे पत्त्याचा पुरावा आवश्यक असेल, ज्या मध्ये सध्या आपण राहत असलेल्या जागेची ओळख सिद्ध होत असेल.

विवाह प्रमाणपत्र: हे नाते प्रमाणित करते आणि पती पत्नी यांची ओळख सिद्ध करते. ज्या मुळे ज्या व्यक्तीच्या नावावर कनेक्शन करायचे आहे त्यांचे नाते संबंध स्पष्ट होते.

सध्याच्या गॅस कनेक्शन माहिती: ट्रान्सफर करू इच्छित असलेल्या विद्यमान गॅस कनेक्शनसाठी ग्राहक ओळखपत्र, खाते क्रमांक आणि कनेक्शन क्रमांक आवश्यक आहे. त्या सोबतच गॅस कनेक्शन बूक देखील आपल्याला जोडणे अवश्यक आहे.

ट्रान्सफर विनंती अर्ज कसा भरावा

तुम्हाला ट्रान्सफर विनंती अर्ज भरावा लागेल. हा अर्ज गॅस वितरकाकडे उपलब्ध असतो आणि  आपण हा अर्ज गॅस वितरीक कंपनी कडे देऊ शकता गॅस कंपनी करून कनेक्शन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करून आपले गॅस कनेक्शन ट्रान्सफर केले जाईल.

  • अर्जामध्ये ही माहिती भरणे अवश्यक
  • सध्या ज्याच्या नावावर कनेक्शन आहे त्यांचे म्हणजे पतीचे नाव आणि खाते क्रमांक
  • नवीन ज्यांच्या नावावर कनेक्शन करायचे आहे म्हणजे पत्नीचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक
  • बदलीचे कारण – गॅस कनेक्शन नाव का बदली करायचे आहे ते कारण.

gas connection transfer अर्ज सादर करणे

एकदा आपण अर्ज भरला आणि आपली सर्व अवश्यक कागदपत्रे जमा केली, तर आपण आपला अर्ज जवळील गॅस वितरकाकडे सादर करा.

gas connection transfer शुल्क भरणे

लक्षात ठेवा की गॅस कनेक्शन स्थलांतरित करण्यासाठी थोड्या प्रमाणात शुल्क असतो . हे शुल्क वितरक कंपनी आणि जागेवर अवलंबून असते सबमिट केल्यावर आपल्याला शुल्क भरावे लागेल. शुल्क भरल्या नंतर आपणास पावती देखील दिली जाते.

मंजूरी प्रतीक्षा

एकदा आपण आपला गॅस ट्रान्सफर अर्ज सादर केल्यानंतर, गॅस वितरक त्यावर प्रक्रिया करतात. ते पुरवठादाराच्या कामाच्या गतीवर किंवा राबवणाऱ्य  प्रक्रियेवर काही दिवसांपासून कित्येक आठवड्यांपर्यंत वेळ लागू शकतो. या अंतरामध्ये, ते आपल्याला अधिक स्पष्टीकरण किंवा अतिरिक्त तपशील तुम्हाला  मिळविण्यासाठी कॉल देखील  करू शकतात.

ट्रान्सफर अर्जाचा पाठपुरावा

काही कालावधीनंतर अर्ज मंजूर न झाल्यास गॅस कंपनीकडून याबाबत पाठपुरावा करणे अवश्यक ठरेल. आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकाद्वारे किंवा स्थानिक कार्यालयाद्वारे देखील  हे करू शकता.

gas connection transfer निष्कर्ष

आपल्या पतीकडून आपल्या पत्नीला गॅस कनेक्शन हस्तांतरित करण्यासाठी आपल्या गॅस वितरक कंपनी द्वारे योग्य प्रक्रिया आणि अवश्यक ती कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे पुरवठ्यात कोणतीही तफावत न येता गॅस सेवा सुरळीत पणे हस्तांतरित होईल. अर्ज यशस्वीरित्या मंजूर झाल्या नंतर आपले कनेक्शन आपल्या पत्नीच्या नावावर होईल आणि आपल्याला मिळणरा लाभ गॅस अनुदान आपल्या नावावर जमा केले जाईल.

1 thought on “gas connection transfer : असे करा पतीच्या नावावरून पत्नीच्या नावावर गॅस कनेक्शन.”

Leave a comment