Gay Gotha Anudan : राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना नेहमीच राबवत असते. तसेच शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी गाय म्हैस पालनासाठी विशेष (Gay Gotha Anudan) अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत दिली जाणार आहे. तर आज आपण या लेखांमध्ये गाय गोठा बांधण्यासाठी किती अनुदान दिले जाते, आवश्यक लागणारी कागदपत्रे, पात्रता व अटी नियम काय आहेत ,अर्ज कुठे व कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Gay Gotha Anudan योजना
महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाय म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत दिली जात आहे. खास करून ही योजना, शेळीपालन, पशुपालन आणि कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी आहे. ग्रामीण भागातील पशुपालनासचालना देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.
या योजनेअंतर्गत लाभ घेणारा शेतकऱ्यांना लाभही मिळत आहे. ही योजना पशुपालकांसाठी फायदेशीर ठरत आहे. तर 22 हजार कामे गाय (Gay Gotha Anudan) गोट्याची मंजूर आहेत. त्यापैकी 1007 कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. आणि सध्या 453 कामे सुरू आहेत.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुलभ करण्याची मदत मिळत आहे, अशी माहिती रोहयोचे कार्यक्रम अधिकारी चेतन हिवंत यांनी दिली .
गाय गोठा योजनेचे फायदे
- आधुनिक पद्धतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते . त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते .
- या योजनेमुळे पशुधनाची निगा राखणे सोपे होणार आहे .तसेच शेतकऱ्यांना गोटा बांधण्यासाठी मोठी रक्कम स्वतः खर्च करावी लागणार नाही .
- या अनुदानामुळे शेतकऱ्यावरील आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होईल .
गाय गोठा योजनेचा अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन
गाय गोठा (Gay Gotha Anudan) योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही .त्यामुळे या योजनेचा लाभ हा ऑफलाईन पद्धतीने घ्यावा लागेल .
ऑफलाइन
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालय मार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागेल . याशिवाय तालुका कृषी अधिकारी कार्यालय,जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातूनही अर्ज करता येतो .
काय आहे ही गोटा योजना
शेतकऱ्यांना,पशुपालकांना या योजनेचा लाभ घेऊन जनावरांचे संगोपन योग्यरित्या करता यावे .त्यांना त्यांचे चांगल्या प्रकारे संरक्षण करता यावे यासाठी शासनाकडून गोठा योजना राबवली जात आहे .
गाय गोठा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील दिलेली कागदपत्रे आवश्यक आहेत.
- सात – बारा उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पशुधन असल्याचा पुरावा
- जागेची मालकी हक्काचे कागदपत्रे अर्जदार शेतकऱ्यांना सादर करावी लागतील .
गाय गोठा साठी अनुदान किती?
- दोन ते सहा जनावरांचा गोठा (Gay Gotha Anudan) बांधण्यासाठी एकूण 77 हजार 188 रुपये अनुदान शासनाकडून दिले जाते.
- सहा ते बारा जनावरांच्या गोट्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांना 1 लाख 54 हजार 376 रुपये दिले जातात.
- 13 पेक्षा जास्त जनावरे असतील तर पहिल्या प्रकारच्या तिप्पट अनुदान दिले जाते. म्हणजेच 2 लाख 31 हजार 564 रुपयाच्या अनुदान दिले जाते.
या योजनेत कोणाला अर्ज करता येऊ शकतो
या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकरी असणे आवश्यक आहे. त्या शेतकऱ्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. याशिवाय त्या व्यक्तीला पशुधन पाहता येण्याचा अनुभव असावा. तसेच ग्रामीण भागातील पशुपालकांना सदर योजनेचा लाभ दिला जात आहे. Gay Gotha Anudan