Gold Monetization Scheme केंद्र सरकारचा मोठा झटका !ही योजना केली बंद,तुमचे पैसे अडकले का? जाणून घ्या सविस्तर

Gold Monetization Scheme : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे . 26 मार्च 2025 पासून सुवर्ण मुद्रीकरण योजना (GMS) बंद करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. बाजारातील बदलती परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे असे अर्थमंत्र्यांने सांगितले आहे. बँकांकडून अजूनही एक ते तीन वर्षाच्या कालावधी सह अल्पकालीन सुवर्णा ठेव योजना चालू शकतील असे सरकारने घेतले आहे.

Gold Monetization Scheme

सुवर्ण मुद्रीकरण योजना

सरकारने मुद्रीकरण योजनाही 15 सप्टेंबर 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश दीर्घकालीन सोन्याच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करणे. तसेच देशातील घराघरांमध्ये आणि संस्थांमध्ये पडून असलेले सोने उत्पादक हेतूसाठी वापर करणे होता जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सोने ठेवून पैसे मिळू शकतील आणि आपली गरज भागू शकेल. नोव्हेंबर 2024 पर्यंत सुवर्ण मुद्रिकरण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 31,164 किलो सोने जमा करण्यात आले आहे. Gold Monetization Scheme

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : मागील वर्ष भरात सोन्याच्या भावात किती रुपयांची झाली वाढ

मध्यम आणि दिर्घ मुदतीच्या सुवर्ण ठेव योजना बंद

केंद्र सरकारने मध्यम मदतीच्या म्हणजे 5 ते 7 वर्ष , आणि दीर्घ मुदतीच्या म्हणजेच 12 ते 15 वर्ष , सुवर्णा ठेव योजना 26 मार्च 2025 पासून बंद केल्या आहेत. परंतु अल्पमुदतीची योजना सुरू ठेवण्यात येणार आहे ही योजना बँका त्यांच्या स्तरावर 1 ते 3 वर्षाच्या ठेव योजना राबवू शकतील.Gold Monetization Scheme

ग्राहकांनी ठेवलेल्या सोन्याचे काय होणार?

जर तुम्ही तुमचे सोने या योजनेमध्ये जमा केले असेल तर काही चिंता करण्याची गरज नाही. जर तुमची ठेव पूर्ण झाली असेल तर तुम्ही ते सोने काढून घेऊ शकतात, सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यांची ठेव अजूनही पूर्ण झालेली नाही किंवा चालूच आहे त्यांना व्याज मिळत राहील आणि मुदतीवर पैसे किंवा सोने मिळतील. जर तुम्हाला तुमचे सोने वेळ पूर्ण होणे अगोदरच काढायचे असेल तर, तुम्हाला पूर्वीचे नियम लागू होतील, त्यामध्ये तुमचा घाटा होऊ शकतो.

26 मार्चपासून कसे राहतील नियम?

26 मार्चनंतर काय होणार असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे? आता इथून पुढे नवीन सोने तुम्हाला मध्यम आणि दीर्घकालीन योजनेमध्ये जमा करता येणार नाही. करण की , मोदी सरकारने सुवर्ण मुद्रीकरण योजना (GMS) बंद केली आहे .आणि जर तुम्ही आधीच जमा केलेली सोने असेल तर ,आहे त्याच पद्धतीने चालू राहतील. Gold Monetization Scheme

सोन्याच्या दरात मोठी वाढ

1 जानेवारी 2024 रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 63,920 रुपये होती , आता 25 मार्च 2025 पर्यंत 41.5 टक्केने वाढ झाली आहे . तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90,450 रुपये एवढी आहे. त्यामुळे जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल तर , तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. कारण की, सरकार तुमच्या ठेवींच्या सुरक्षिततेची हमी देत ​​आहे.Gold Monetization Scheme

Leave a comment