pik vima yojana शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी देशात पंतप्रधान पिक विमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण मिळते. शेतीमालाचे व शेत पिकाचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून पिक विमा योजना सुरू करण्यात आली.
केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेला राज्य शासनाने अधिक बळकटी देत एक रुपयात पिक विमा योजनेची घोषणा केली. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार घडल्यामुळे राज्य शासनाकडून आता या योजनेसाठी बदल करण्याची घोषणा केली आहे.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पिक विमा योजनेत काही मोठे बदल करनार असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांना लाभदायक आणि प्रभावी अशी पिक विमा योजना राज्य शासन निर्माण करणार आहे.
जुन्या पिक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून येत आहेत या त्रुटींचा फायदा घेतच अनेक गैरप्रकार देखील समोर आले आहेत. या त्रुटीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत देखील विलंब होत आहे. यानुसारच आता या जुन्या नियमावलीमध्ये काही बदल करणार असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली आहे.
मिलेट बोर्ड स्थापन होणार pik vima yojana
pik vima yojana राज्यामध्ये तृणधान्याच्या उत्पादन वाढवण्यासाठी राज्यात मिलेट बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे. या बोर्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून शेतीत अधिक उत्पादन मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील शेतीच्या भांडवली गुंतवणुकीची दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीतील चर्चेच्या माध्यमातून राज्यात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून कृषी सुविधा अधिक स्वरूपात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच पोखरा योजनेसारखीच आणखी एक नवीन योजना राबवण्याची देखील शक्यता यावेळी वर्तवण्यात आली.
लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल पीक विम्याची रक्कम
pik vima yojana पिक विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार आंदोलने निवेदने पाठपुरावा करावा लागतो. शेतकऱ्यांना विम्याची मिळाली रक्कम वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या योजनेबाबत अतिशय नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीवर समाधान मिळवण्यासाठी पिक विमा योजनेत विशिष्ट बदल करण्यात येणार आहेत. नवीन बदलानुसार शेतकऱ्यांना अवघ्या चार ते आठ दिवसांमध्ये पिक विम्याची रक्कम वितरित करण्याची सुविधा देखील यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
1 रुपयातील पिक विमा योजना होणार पारदर्शक
राज्य शासनाने एक रुपयांमध्ये पिक विमा योजना सुरू केल्यापासून राज्यामध्ये पीक विमा योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केल्याचे आढळून आले. आमदार सुरेश धस यांनी अधिवेशनादरम्यान पिक विमा घोटाळ्याची संपूर्ण माहिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावर उपायोजना करण्यासाठी राज्य शासन नवीन नियमावली तयार करत आहे. या नवीन नियमावलीनुसार पिक विमा योजना अत्यंत पारदर्शक आणि अगदी सोपी पिक विमा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
नवीन नियमावलीनुसार अर्ज प्रक्रिया, विमा तक्रार, पिक विमा मंजुरी अत्यंत जलद गतीने पार पाडली जाणार आहे. नवीन नियमावलीनुसार शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा शेतकऱ्यांना वेळेत मिळेल अशी वही देखील यावेळी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
शासनाच्या या नवीन धोरणानुसार पिक विमा योजना अत्यंत पारदर्शक होईल व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरित करण्यात येईल अशी माहिती यावेळी दिली आहे. नवीन नियमावली नुसार आणि शासनाच्या नवीन धोरणानुसार विमा योजना अत्यंत पारदर्शक करणार असल्याचे पहायला मिळत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या नवीन धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा प्रमाणावर मदत होणार आहे. नवीन नियमानुसार राज्यातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम होईल.pik vima yojana