gold silver price today : आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालिवर सोने चांदीचे दर कमी जास्त होत असतात. सोने आणि चांदी कडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. सोन्याच्या किमती कधी कमी तर कधी जास्त देखील होतात. आजचे सोन्याचे दर व सोने गुंतवणुकीतील फायदे या बद्दल माहिती पाहुयात.
सोन्याच्या किंमतीतील घसरण कशामुळे?
देशात दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. दिवाळी सण संपल्यानंतर सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता, डॉलरची वाढती किंमत आणि जागतिक आर्थिक घटक यांमुळे भारतीय बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सोन्याच्या किमती मधील बदल gold silver price today
२४ कॅरेट सोन्याचा दर आता ७८,१०६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे, जो ४६० रुपयांनी कमी झाला आहे. सोने खरेदी करताना हॉलमार्क असलेले सोने घ्यावे, जे अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर असते. दिवाळी पूर्वीच्या सोन्याच्या दरात आणि आजच्या सोन्याचा दरात तफावत पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात 460 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.
चांदीचे आजचे नवीन दर
gold silver price today सराफा बाजारात चांदीचा दर एकाच दिवसात २,२६८ रुपयांनी कमी झाला आहे, आणि आता प्रति किलो ९१,९९३ रुपये झाला आहे. मागील काही दिवासपूर्वी चांदीचे भाव 94261 रुपयावर होते. आता सोन्याचे भाव ढासळून 91993 रुपायवर पोहोचले आहेत.
गुंतवणुकीचा विचार करताना काय करावे?
सोन्या चांदी मध्ये गुंतवणूक कधी करावी हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो. सोन्या-चांदीच्या किंमती कमी असल्याने आता गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. जे गुंतवणूकदार दीर्घकालीन नफा पाहत आहेत, त्यांनी या किंमतींचा फायदा घेऊन खरेदी करण्याचा विचार करू शकतात. सोन्या चांदीच्या किमती कमी असताना केलेली गुंतवणूक अधिक फायदा देते.
सोन्या-चांदीत गुंतवणूक करण्याची फायदे
सोनं आणि चांदी हे मौल्यवान धातू दीर्घकालीन संपत्ती म्हणून ओळखले जातात. तसेच, किंमतीत वाढ झाल्यास चांगला नफा मिळू शकतो. बाजार अभ्यासकाच्या मते सोन्यात गुंतवणूक केल्यास नेहमी फायद्यात राहते. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि वाढीची हमी मिळते.
गुंतवणुकीसाठी काही महत्त्वाचे टिप्स
- सोनं-चांदी खरेदी करताना प्रमाणित विक्रेत्याकडूनच खरेदी करा.
- भविष्यातील वाढीचा अंदाज घेऊन योग्य प्रमाणात गुंतवणूक करा.
- हॉलमार्क आणि शुद्धता याची खात्री करा.
- सोने खरेदी केल्या नंतर खरेदी बिलची मागणी करा.
- खरेदी केलेल्या सोन्याची बिले सांभाळून ठेवा.