Jagdeep Singh SALARY सध्या च्या युगात पैसा कमावणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. बऱ्याच वेळा आपण दहा हजार, पन्नास हजार, लाख भर किंवा दोन लाख रुपये महिना पगार घेणारे व्यक्ति आपण पाहत असतो. माध्यम ते चांगला पगार असावा असे प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे स्वप्न सुद्धा असते. बऱ्याच व्यक्ति चे तर 20000 ते 30000 एवढे मानधन असावे असे स्वप्न आहे. पण आपण असा कधी विचार केला का जास्तीत जास्त किती कोण पगार घेत असेल. तर आज आपण सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग यांच्या प्रती दिन पगार बद्दल माहिती घेऊयात. थोडक्यात जर बोलायचे झाले तर यांची एक दिवसाची पगार अनेक लोकांची आयुष्याची कमाई पण असू शकते, तर काहींना आयुष्य भर काम करून देखील एवढा पगार मिळत नसतो.एवढी त्यांची एक दिवसाची कमाई आहे.
Jagdeep Singh SALARY जेव्हा जगातील सर्वाधिक पगार असलेल्या सीईओंचा उल्लेख होतो, तेव्हा सत्या नडेला, सुंदर पिचाई आणि एलन मस्क यांची नावे समोर येतात. परंतु, एका दिवसाला 48 कोटी तर वर्षाला 17000 कोटी रुपये ! जगात सर्वाधिक मानधन घेणारा व्यक्ती आहे तरी कोण? तर या व्यक्तीचे नाव आहे जगदीप सिंग . जगदीप सिंग यांचा पगार ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण की जगदीप सिंग हा दिवसाचे 48 कोटी रुपये कमवतो. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत जगदीप सिंग आणि त्यांच्या यशाचे रहस्य.
Jagdeep Singh SALARY जगातील सर्वाधिक मानधन घेणारे CEO कोण?
भारतीय वंशाचे जगदीप सिंग, हे नाव सध्या जगभर चर्चेत आहे. त्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण कामामुळे आणि मेहनतीमुळे जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या CEO चा किताब पटकावला आहे.
जगदीप सिंग हे QuantumScape या कंपनीचे संस्थापक आहेत. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रगत बॅटरी तंत्रज्ञान विकसित करते. त्यांच्या या तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती घडवण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
हे वाचा: मोदी सरकारची ड्रोन दीदी योजना
जगदीप सिंग कोण आहेत?
Jagdeep Singh SALARY जगदीप सिंग हे भारतीय वंशाचे उद्योजक असून सध्या ते अमेरिकेत राहतात. 2010 मध्ये त्यांनी क्वांटमस्केप नावाची कंपनी स्थापन केली, जी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) सॉलिड-स्टेट बॅटरी बनवते. या बॅटरीच्या वैशिष्ट्यांमध्ये चार्जिंगचा वेळ कमी करणे आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे यांचा समावेश आहे. त्यांच्या या तंत्रज्ञानाने इलेक्ट्रिक वाहन उद्योगात क्रांती घडवून आणली आहे. त्यांच्या कल्पकतेमुळे जगदीप सिंग यांना जागतिक स्तरावर खूप प्रतिष्ठा मिळाली आहे.
शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कारकीर्द
Jagdeep Singh SALARY जगदीप सिंग यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली आहे. शिक्षणानंतर त्यांनी अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम केले. परंतु त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी असल्यामुळे त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली. कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीमुळे त्यांनी क्वांटमस्केपला केवळ एक यशस्वी कंपनीच नाही, तर नवतंत्रज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव बनवले आहे.
सर्वाधिक पगार घेण्याचे मानकरी
2020 मध्ये क्वांटमस्केप यूएस स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली. गुंतवणूकदारांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे कंपनीचे मूल्यांकन झपाट्याने वाढले. जगदीप सिंग यांच्या पगाराच्या पॅकेजमध्ये 2.3 अब्ज डॉलर किमतीचे समभाग समाविष्ट होते. यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 17,500 कोटी रुपये झाले. हा पगार उद्योगातील सर्वाधिक पगारांपैकी एक ठरला आहे.
2024 मध्ये सीईओ पदाचा राजीनामा
फेब्रुवारी 2024 मध्ये जगदीप सिंग यांनी क्वांटमस्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. त्यांनी कंपनीची जबाबदारी शिवा शिवराम यांच्याकडे सोपवली. मात्र, यानंतरही त्यांनी थांबण्याचे ठरवले नाही. सध्या ते एका ‘स्टेल्थ स्टार्टअप‘ चे सीईओ आहेत, जे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करत आहे.
नवीन प्रवास आणि आव्हाने
Jagdeep Singh SALARY जगदीप सिंग सध्या एका गुप्त प्रकल्पावर काम करत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर (@startupjag) मिळालेल्या माहितीनुसार, ते अशा प्रकल्पांवर काम करत आहेत जे भविष्यात उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल घडवतील.
उद्योग आणि तंत्रज्ञानासाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्व
जगदीप सिंग यांचा प्रवास हा कठोर परिश्रम, दूरदृष्टी आणि नाविन्यपूर्ण विचारांची शिकवण देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली क्वांटमस्केपने तंत्रज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांचा नवीन स्टार्टअपसुद्धा भविष्यात उद्योगात एक नवीन क्रांती घडवेल याची शक्यता आहे.
जगदीप सिंग हे नक्कीच प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या यशाचा आलेख भविष्यातही उंचावत राहील.