जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा ? जाणून घ्या सविस्तर माहिती : Jamin Mojani Arj 2024

Jamin Mojani Arj 2024 भुमिअभिलेख विभागाची सुरुवात ब्रिटिश काळामध्ये झाली होती 1929 ते 1930 मध्ये झालेल्या मोजणीनंतर जमिनीचे असंख्य तुकडे पडले गेले . कालांतराने महसूल विभाग भुमिअभिलेख आणि नोंदणी विभागाचे तीन भाग बनवले भुमिअभिलेख विभागाकडून प्रत्यक्ष जागेवरील वहिवाटी नुसार पडलेले त्यांचे फाळणी नकाशे तयार केले गेले सध्या भुमिअभिलेख विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या नियंत्रणाखाली कार्य करत आहेत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Jamin Mojani Arj 2024

जमीन मोजणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमीन मोजणी करण्यासाठी किती शुल्क आकारले जाते आणि जमीन मोजणी करण्याचे प्रमुख प्रकार कोणते याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्हाला ही भूमी अभिलेख या द्वारे आपल्या जमिनीची मोजणी करायचे असेल तर याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

Jamin Mojani Arj 2024 तीन प्रमुख प्रकार :

  • साधी मोजणी – सहा महिन्यांच्या कालावधीत केली जाते
  • तातडीची मोजणी – जी मोजणी तीन महिन्यांमध्ये केली जाते
  • अति तातडीची मोजणी – जी दोन महिन्याच्या आत केली जाते

हे वाचा: पीएम किसान FPO योजना ,शेतकऱ्यांना देण्यात येणार 15 लाख रुपयांची मदत

जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते ?

Jamin Mojani Arj 2024 एक हेक्टर क्षेत्रावर जर साधी मोजणी करायची असेल तर ₹1000 एवढे शुल्क आकारले जाते तर तातडीची मोजणी करायची असेल तर एक हेक्टर क्षेत्रासाठी 2000 रुपये आकारले जातात आणि अति तातडीच्या मोजणीसाठी 3000 रुपये शुल्क प्रति हेक्‍टर क्षेत्रासाठी आकारले जाते.

Jamin Mojani Arj 2024 कागदपत्रे कोणती ?

  • मोजणीचा अर्ज
  • मोजणी शुल्क चलन किंवा पावती
  • तीन महिन्याच्या आतील सातबारा उतारा

Jamin Mojani Arj 2024 अर्ज कुठे करावा ?

जमीन मोजणी महाराष्ट्र मध्ये करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल या अर्जाचा नमुना महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला भेटेल यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून भूमी अभिलेखचे वेबसाईटला भेट देऊ शकता.

https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in

  • सर्वप्रथम तुम्हाला ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे त्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचे नाव तेथे टाका
  • त्यानंतर पहिला पर्याय अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता या विषयी माहिती भरा अर्जामध्ये गाव तालुका आणि जिल्हा अशी देखील माहिती भरावी लागेल
  • पुढे मोजणी करण्यासंबंधीची माहिती आणि मोजणीचा प्रकार तपशील हा पर्याय दिसेल यामध्ये मोजणीच्या प्रकारासमोर मोजणीचा कालावधी आणि उद्देश लिहायचा आहे
  • पुढे तालुक्याचे नाव गाव आणि शेत जमीन ज्या गट क्रमांक येते त्या गटाचा क्रमांक टाकायचा आहे
  • तिसऱ्या पर्यायांमध्ये सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फी ची रक्कम यासमोर ती रक्कम लिहा आणि त्यासाठी चलन किंवा पावती क्रमांक आणि तारीख लिहायचे आहे
  • किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि किती कालावधीत करून घ्यायची आहे यानुसार ठरते

Leave a comment