Kapus Kharedi 2024 महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त उत्पादित होणारे पीक म्हणजे कापूस आहे फक्त महाराष्ट्र मध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते महाराष्ट्रामध्ये या पिकाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात कापूस पिकाची लागवड मराठवाडा विदर्भ आणि खानदेश याबरोबरच मध्य महाराष्ट्र मधील जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असते.
राज्यातील शेतकरी दरवर्षी कापूस पीक मोठ्या उत्साहाने घेत असतात परंतु गेल्या दोन वर्षापासून कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते शेतकऱ्यांना कितीही नुकसान सहन करावे लागले तरी कापसाच्या उत्पादनावरील उभारी मात्र काही कमी झाली नाही या हंगामात देखील कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
हे वाचा: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली
Kapus Kharedi 2024 कापूस खरेदीला सुरुवात :
Kapus Kharedi 2024 आज आपण आपल्या या लेखामध्ये यावर्षीच्या हंगामातील कापूस आता बाजारामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे सध्या काही दिवसांपूर्वी खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदी ची सुरुवात करण्यात आली आहे यानंतर खेती या बाजार समितीमध्ये देखील कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे या बाजार समितीमध्ये पहिल्याच दिवशी कापसाला 7700 प्रतिक्विंटल एवढा तर मिळाला आहे या ठिकाणी पहिल्या दिवशी बाजारात 120 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
कापसाला मिळतो एवढा दर :
Kapus Kharedi 2024 कापूस खरेदी सुरू होणार आहे हे समजताच बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या वाहनांची गर्दी वाढली आहे या बाजारामध्ये कमीत कमी पाच हजार पन्नास रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 7700 रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 7200 प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे या ठिकाणी कापसाचे एकूण 120 क्विंटल आवक झाली होती.
ज्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लवकर लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा कापूस काढण्यासाठी तयार झाला आहे आणि तोच कापूस सध्या बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहे प्रत्येक वर्षी कापसाचे आवक सप्टेंबर महिन्यापासून सुरू होत असते परंतु विजयादशमी पासून खऱ्या अर्थाने आवक वाढत असते यावर्षी देखील विजयादशमी पासून कापसाची आवक वाढणार आहे त्यामुळे जेव्हा कापसाचे विक्रमी आवक सुरू होईल तेव्हा कापसाला किती भाव मिळतो हे पाहण्यासारखे राहणार आहे.