Kisan Credit Card :सरकार देणार 5 लाख रुपयाची मर्यादा असलेलं क्रेडिट कार्ड!कसा करायचा अर्ज,जाणून घ्या…

Kisan Credit Card : आता सरकार तुम्हाला क्रेडिट कार्ड देणार आहे .2025 च्या अर्थसंकल्पात सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC) चहा कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. सरकारचा असा उद्देश आहे की, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देणे, डिजिटल फायनान्स ला चालना देणे आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे असा सरकारचा उद्देश आहे . तर आज आपण या लेखांमध्ये किसान क्रेडिट कार्डाचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल, किती कर्ज दिले जाते, व्याजदर किती आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेऊया .

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या कर्जाची मर्यादा तीन लाख रुपये वरून पाच लाख रुपये करण्याची घोषणा केली. सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे, कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगती सह ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Kisan Credit Card

Kisan Credit Card योजना म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) ही योजना 1998 मध्ये राबविण्यात आली आहे. आणि या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर अल्प मुदतीचे कर्ज देणे, जेणेकरून शेतकऱ्याना बी – बियाणे, खते, कृषी अवजारे, इतर आवश्यक वस्तू आणि उत्पादनासाठी निधी मिळवू शकेल . या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी संबंधित कामकाजासाठी सहजरित्या कर्ज मिळू शकते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

मार्च-एप्रिल 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत 7.75 कोटी सक्रिय खाती होती आणि एकूण ₹9.81 लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे . यावरून ही योजना शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होते.

हे वाचा : सिनियर सिटिझन्ससाठी सरकारच्या 7 नवीन योजना,पहा सविस्तर माहिती आणि फायदे काय आहेत

Kisan Credit Card या योजनेत कोणते बदल केले?

2025 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेत कर्जाची मर्यादा 3 लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांना डिजिटल आर्थिक समावेश देखील अधिक सक्षम होईल.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

किसान क्रेडिट कार्ड कसे कार्य करते?

किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) हे एक मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड आहे ज्यामध्ये पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) आणि इंटरनॅशनल आयडेंटिफिकेशन नंबर (IIN) असतो. हे कार्ड ATM च्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी आणि कर्जाचा वापर सहज करण्यासाठी उपयोगी आहे. या कार्डामुळे शेतकऱ्यांना आवश्यक कर्ज वेगाने मिळवता येईल.

आता शेतकऱ्यांना सुधारीत व्याज अनुदान योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. हे कर्ज शेतकऱ्यांच्या कृषी गरजांसाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीला मदत करेल.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्यम पोर्टल msme.gov.in ला भेट द्या.
  • त्यानंतर तुम्हाला Quick Links वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Udyam Registration या परिवार क्लिक करावे लागेल आणि रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन साठी आवश्यक लागणारे डॉक्युमेंट्स आणि पात्रते संदर्भातही माहिती मिळेल.
  • अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात.

Kisan Credit Card योजनेला मुदतवाढ

2025 च्या अर्थसंकल्पात सरकारने किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजनेचा लाभ 7.7 कोटी शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे. याचा जास्तीत जास्त फायदा विशेषता लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे, तसेच पशुपालन व मत्स्यव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत दिलीजणार आहे .

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे

अर्थसंकल्प 2025 नुसार अतिरिक्त 1 कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणण्याची सरकारची योजना आहे. याचा फायदा विशेषतः त्या शेतकऱ्यांना होईल जे कर्ज आणि आर्थिक मदतीपासून वंचित राहिले आहेत.

किसान क्रेडिट कार्डवरील सबसिडी

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 3 लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर सवलतीचा व्याजदर 7 टक्के आहे. जर एखाद्या शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली तर त्या शेतकऱ्याला 3 टक्के व्याज अनुदान मिळते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे अंतिम व्याजदर 4 टक्क्यापर्यंत कमी होतो.
पण मात्र, 3 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेच्या कर्जावर विविध बँकेचे व्याजदर लागू असतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर आपल्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्व माहिती घ्यावी किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा Kisan Credit Card

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

Leave a comment