ladaki bahin yojana update महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येत आहे. योजनेचे अंतर्गत आतापर्यंत सात हप्त्यांचे वितरण महिलांचे बॅक खात्यावर करण्यात आलेले आहे. त्यासोबतच आता आठव्या हाताबाबत म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा लाभ वितरित करण्यात देखील सुरुवात झालेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळीच योजनेमध्ये नियम व निकष तयार करण्यात आले होते. मात्र बहुतांश महिलांनी योजनेत बसत नसताना देखील या योजनेमध्ये अर्ज केला होता. तसेच त्यांना आतापर्यंत योजने अंतर्गत लाभ देखील वितरित झाला आहे. परंतु ज्यावेळी अपात्र महिलांनी देखील लाभ घेतला आहे अशी माहिती शासनाच्या निदर्शनात आली, तेव्हा त्यांचे नाव योजनेमधून वगळण्याचे काम शासनाने राबवण्यास सुरुवात केली. या हाती घेतलेला मोहिमेच्या अंतर्गत शासनाने पाच लाखापेक्षा अधिक महिलांना योजनेतून वगळले आहे. यादरम्यान विरोधकांनी सरकारला ट्रोल करत सरकार योजना बंद करणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली. यावर प्रत्युत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

फेब्रुवारी हप्त्या वितरण प्रक्रिया सुरू
राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना आता पर्यन्त 7 हप्ते वितरित केले आहेत. राज्यातील महिलाना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्यातील पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ वितरित केला जाणार आहे. सर्व निकष व अटी मध्ये पात्र असणाऱ्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा लाभ वितरित करण्यास देखील सुरवात झाली आहे.
हे वाचा: लाडकी बहीण योजनेतून आणखी 55000 महिला अपात्र
एकनाथ शिंदे यांनी काय दिली माहिती ladaki bahin yojana update
ladaki bahin yojana update लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नसल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणीचे विरोधात जाणाऱ्यांना लाडक्या बहिणीने जोडा दाखवला असा हल्लाबोल ही उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया येथील भाषणात केला.
भाषणात विरोधकावर देखी टीका
यावेळी बोलताना विरोधकावर देखील जोरदार निशाणा लगावला. हा एक ऐतिहासिक विजय असून तुमच्या आशीर्वादाने 232 जागा निवडून आल्या. पायाला भिंगरी लावून मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. चार हजार कोटींचा निधी आपण एकट्या भंडारा विधानसभा मतदारसंघाला दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदीचे आप महान हो असं म्हटलं तरी लोकांच्या पोटात दुखत आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो तर यांच्या पोटात दुखत आहे. आधे इधर आधे उधर मागे कोणीच नाही अशी यांची परिस्थिती झाल्याचा टोला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया येथील भाषणादरम्यान लगावला आहे. ladaki bahin yojana update
1 thought on “ladaki bahin yojana update : लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे कडून दिलासा; म्हणाले योजना”