लाडकी बहीण योजनेचे पैसे झाले जमा. LADKI BAHIN 7500

LADKI BAHIN 7500 राज्य शासनाने राज्यातील महिलां सशक्तीकरणासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 रुपये एवढा लाभ देण्याची शासनाने मंजूर दिली. यासाठी शासनाकडून अर्ज मागविण्यात आले. अर्ज करण्यासाठी महिलांना तारीख वाढ देऊन शेवटी 15 ऑक्टोंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती. या अंतर्गत ज्या महिलांनी नोंदणी केली आहे त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या मदतीने रक्कम जमा करण्यात आली आहे. परंतु बऱ्याच महिलांनी नोंदणी करून देखील त्यांना काही तांत्रिक कारणामुळे किंवा त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक नसल्यामुळे ही रक्कम मिळाली नव्हती. त्या महिलांना देखील आता ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

LADKI BAHIN 7500 कोणत्या महिलांना मिळाला लाभ.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नोंदणी केलेल्या बऱ्याच महिलांना अर्ज मंजूर होऊन देखील रक्कम मिळाली नव्हती. त्यामध्ये त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे ही अडचण त्यांना आली होती ज्या महिलांनी आपल्या बँक खाते आपल्या आधार सोबत लिंक करून घेतले आहे त्या महिलांना शासनाकडून लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. या महिलांना मागील सर्व हप्ते वितरित केले जात आहेत.

किती मिळाली रक्कम.

LADKI BAHIN 7500 ज्या महिलांना याआधी एकही हप्ता मिळाला नव्हता त्या महिलांना पूर्ण पाच महिन्याची हप्ते एक सोबत वितरित करण्यात आले आहेत. डीबीटी च्या माध्यमातून या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि दिवाळी बोनस करिता शासनाने ठरवून दिलेले ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्याचे 7500 या महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दिनांक 17 ऑक्टोबर पासून ही रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे.

हे वाचा: लाडक्या बहिणींना मिळणार आता दिवाळी बोनस 5500 रुपये

लाभ मिळण्यास का झाला उशीर

LADKI BAHIN 7500 लाडकी बहीण योजना अंतर्गत जुलै महिन्यातच अर्ज करून देखील बऱ्याच महिलांना एकही हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता; त्याचं कारण असे आहे की महिलांचे अर्ज मंजूर झाले नव्हते किंवा काही कागदपत्राच्या त्रुटीमुळे प्रलंबित होते. त्या महिलांना देखील ती त्रुटी भरून काढण्यास वेळ दिला होता. त्या महिलांनी त्रुटी भरून काढण्यासाठी विलंब केला त्यामुळे देखील त्यांना ही रक्कम मिळण्यास उशीर झाला. त्यासोबतच बऱ्याच महिलांचे बँक खाते आपल्या आधार कार्ड सोबत लिंक नव्हते किंवा बँक खात्याची केवायसी करणे बाकी होते या कारणामुळे देखील महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जात नव्हती. आता ज्या महिलांनी आपल्या बँक खात्याला आपले आधार लिंक केले आहे. त्या महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम हळूहळू जमा होत आहे या माध्यमातून या पात्र महिलांना मागील पाच महिन्याचे 7500 (LADKI BAHIN 7500) रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहेत.

उशिरा अर्ज केलेल्या महिलांना देखील दिला लाभ.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनि उशिरा अर्ज केले आहेत त्या महिलांना देखील 7500 रुपये जमा होत आहेत. ज्या महिलांनी उशिरा अर्ज सादर केले आहेत आणि त्याचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. अश्या सर्व महिलांना मागील 3 महिन्याचे व दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्याचे पैसे जमा होत आहेत. जसे अर्ज मंजूर होतील त्या नुसार ही रक्कम वितरित केली जाईल.

Leave a comment