ladki bahin yojana राज्य शासनाने महिलांच्या हितासाठी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेचे अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना, व ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे. अशा महिलांना प्रति महिना 1500 रुपये लाभ देण्याचे शासन घोषणा केली.
लाडकी बहीण योजना काही काळासाठी बंद
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे या निवडणुकीसाठी राज्यामध्ये 15 ऑक्टोंबर ते 23 नोव्हेंबर यादरम्यान आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या वेळापत्रकानुसार राज्यांमध्ये 20 नोव्हेंबर मतदान होईल तर 23 तारखेला निकाल जाहीर होतील यादरम्यान राज्यामध्ये कोणत्याही शासकीय योजनेची घोषणा किंवा अंमलबजावणी करता येत नाही.
हे वाचा: आचार संहिता म्हणजे नेमके काय?
त्यामुळेच आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम किंवा नवीन नोंदणी त्यासोबतच याबद्दलचा निधी वितरित करण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया तूर्तास थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या प्रक्रिया थेट 23 नोव्हेंबर च्या नंतर नवीन सरकार निर्माण झाल्या नंतरच सुरू केल्या जातील व उर्वरित महिलांना लाभ देण्यासाठी पुढील प्रक्रिया नंतर राबवली जाईल.
ladki bahin yojana उशिरा अर्ज केलेल्या महिलांना कधी मिळणार लाभ.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून अर्ज सुरू झाले होते परंतु बऱ्याच महिलांना काही कागदपत्रांच्या अभावामुळे अर्ज करण्यास उशीर झाला होता. या महिलांना उशिरा अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आता त्यांचे अर्ज तपासणी देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे अर्ज तपासणी निवडणुकीमुळे (आचारसंहितेमुळे) बंद करण्यात आली आहे. या महिलांचे अर्ज आता आचारसंहिता संपल्यानंतर तपासले जातील व त्यानंतरच त्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत चा लाभ वितरित केला जाईल.