Ladki Bahin Yojana 3rd Hafta 2024 महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात दरम्यान तिसऱ्या महिन्याचे अनुदान हे महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरू झाले आहे.
हे वाचा : मोफत शिलाई मशीन वाटप असा करा अर्ज
आता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली त्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे आताच्या महिलांनी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरले आहेत त्यांच्याही खात्यामध्ये लवकरच 1500 रुपये जमा होणार आहेत.
Ladki Bahin Yojana 3rd Hafta 2024 पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस :
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार याची सध्या राज्यांमधील लाडक्या बहिणींमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे 19 सप्टेंबर 2024 रोजी हा हप्ता जमा होईल असे सांगण्यात आले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे बोलत असताना या विषयी महत्त्वाची माहिती दिली आहे या योजनेसाठी निधीची कशी आणि किती तरतूद करण्यात आली आहे याची सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे तर तिसरा हप्ता कधी जमा होणार याचे संकेत सुद्धा दिले आहेत त्यांनी ही योजना बंद करण्यासाठी विरोधक काय कारणाने करत आहेत याचा पाढाच वाचला.
Ladki Bahin Yojana 3rd Hafta 2024 आतापर्यंत एक कोटी 60 लाख बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आता दोन कोटीच्या वर खात्यामध्ये पुन्हा पैसे जमा होणार असल्याचे फडणवीस यांनी म्हणाले आहे. त्या नुसार आता महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सुरू करण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana 3rd Hafta 2024 कधी होणार जमा :
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण दोन लाख 31 हजार 294 नवीन महिलांनी अर्ज केले आहेत परंतु आतापर्यंत अनेक महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्यामुळे हजारो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर बँक अकाऊंट आणि आधार नंबर लिंक करावेत.
Ladki Bahin Yojana 3rd Hafta 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता वितरित करण्यास सुरू केले असून राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केला जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे महिलांनी काळजी करण्याची काहीही गरज नाही. राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 29 सप्टेंबर पर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजने अंतर्गत तिसरा हप्ता जमा केला जाणार आहे.
1 thought on “लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता जमा होण्यास सुरवात ; Ladki Bahin Yojana 3rd Hafta 2024”