लाडकी बहीण योजनेतून आणखी 55000 महिला अपात्र : पहा सविस्तर Ladki Bahin Yojana 8th Installment update

Ladki Bahin Yojana 8th Installment update राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व महिलांचे जीवनात सुख समृद्धी निर्माण व्हावी म्हणून; राज्य शासनाने राज्यांमध्ये खास करून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये एवढी रक्कम वितरित केली जाते. यासाठी पात्र असणाऱ्या महिलांना अर्ज करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. अर्ज सादर केलेल्या महिला पैकी पाच लाख महिलांची अर्ज आधीच बाद करण्यात आलेले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Ladki Bahin Yojana 8th Installment update निवडणुकीपूर्वी घोषणा केलेल्या योजनेमध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक महिलेला लाभ वितरित केला जात होता. परंतु आता सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारकडून लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज केल्या महिलांची अर्ज तपासणी सुरू केली आहे. ही अर्ज तपासणी दरम्यान राज्यातील पाच लाख पेक्षा अधिक महिला अपात्र ठरविण्यात आल्या आहे. यानंतर आता परत मराठवाड्यातील 55 हजार महिलांचा समावेश देखील अपात्र यादीमध्ये करण्यात आलेला आहे.

हे वाचा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना – नवीन अपडेट आणि बदल

आणखी 55000 महिलाना मिळणार नाही फेब्रुवारी चा हप्ता. Ladki Bahin Yojana 8th Installment update

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मराठवाड्यातील अर्ज केलेल्या 55 हजार महिलांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ वितरित केला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठवाड्यातील आणखी 55 हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे. या महिलांना आतापर्यंत सात हप्त्याचे वितरण यशस्वीरित्या करण्यात आले होते. परंतु त्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरत असल्यामुळे त्यांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार नाही.

Ladki Bahin Yojana 8th Installment update मराठवाडा विभाग अंतर्गत 21 लाख 97 हजार महिलांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले होते. मराठवाडा विभागांतर्गत 23 लाख पेक्षा जास्त अर्ज महिलांनी सादर केले होते. यापैकी 55000 पेक्षा जास्त अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत.

शासनाने निवडणूक झाल्यानंतर लाडक्या बहिणीची पडताळणी सुरू केली. यामध्ये अनेक अर्ज बनावट असल्याची माहिती देखील समोर आली. त्यासोबतच इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, चार चाकी वाहन नावावर असणाऱ्या महिला आणि वय वर्ष 65 पेक्षा जास्त असणाऱ्या महिला यांची तपासणी करून शासनाने अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

Ladki Bahin Yojana 8th Installment update

मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती महिला अपात्र

शासनाने सुरू केलेल्या अर्ज पडताळणी दरम्यान या आदेश पाच लाख पेक्षा अधिक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. आता त्यात परत मराठवाड्यातील 55000 अर्ज बाद करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती अर्ज बाद करण्यात आले आहे याची माहिती पाहूया. छत्रपती संभाजी नगर मध्ये 6655, धाराशिव जिल्ह्यामध्ये 2533 अर्ज, लातूर जिल्ह्यामध्ये 8001 अर्ज, जालना जिल्ह्यामध्ये 9622 अर्ज, हिंगोली जिल्ह्यांमध्ये 5825 अर्ज ,परभणी जिल्ह्यामध्ये 2800, बीड जिल्ह्यामध्ये 9364 अर्ज, नांदेड जिल्ह्यामध्ये 10500 अर्जदार महिलांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत.

या महिलांना या आधी 7 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. पण आता या महिलांचे अर्ज बाद केले आहेत. अर्ज बाद केल्यामुळे या 55000 महिलांना येणारा म्हणजे 8 वा हप्ता वितरित केला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana 8th Installment update

2 thoughts on “लाडकी बहीण योजनेतून आणखी 55000 महिला अपात्र : पहा सविस्तर Ladki Bahin Yojana 8th Installment update”

Leave a comment

Close Visit Batmya360