लाडकी बहीण मे महिन्याचा हप्ता वाटप : तारीख निश्चित.

माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या प्रलंबित हप्त्यासाठी अखेर निधीची तरतूद; २८ मे रोजी शासन निर्णय निर्गमित, लाखो महिलांना दिलासा.

ऑन पेज उपशीर्षक:

  • ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी मंजूर
  • २८ मे रोजी शासन निर्णयाद्वारे ३३१९ कोटींहून अधिक निधी वितरित
  • सर्वसाधारण व आदिवासी भगिनींना दिलासा
  • लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार (DBT) ladki bahin yojana may installment date

राज्यातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आणि मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निधीच्या उपलब्धतेअभावी रखडलेला मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी राज्य शासनाने २८ मे २०२५ रोजी निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंबंधी दोन महत्त्वाचे शासन निर्णय (Government Resolution) जारी करण्यात आले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

अखेर निधी मिळाला, महिलांना मोठा दिलासा: लाडकी बहीण

मे महिना संपत आला तरी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी महिला चिंताग्रस्त होत्या. परंतु, शासनाने २८ मे २०२५ रोजी निधी वितरणाला मंजुरी दिल्याने आता लवकरच हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल.

शासकीय निर्णयानुसार निधीची व्यवस्था:

राज्य शासनाने ‘माझी लाडकी बहीण’ (mazi ladaki bahin yojna)योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमित हप्त्यांचे वितरण करण्यासाठी एकूण २८ हजार २९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी, सध्या मे महिन्याच्या हप्त्याकरिता २ हजार ९८४ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत हा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाईल.

आदिवासी भगिनींसाठी विशेष तरतूद:

याव्यतिरिक्त, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातूनही या योजनेत अनुसूचित जमातीच्या (Scheduled Tribe) पात्र महिला लाभार्थ्यांसाठी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागासाठी एकूण ३ हजार २४० कोटी रुपयांचा निधी असून, त्यापैकी ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी २८ मे २०२५ रोजी हप्त्याच्या वितरणासाठी मंजूर करण्यात आला आहे.

हे पण वाचा:
new rule ration card रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल: new rule ration card

लाभार्थी महिलांना किती रक्कम मिळणार?

लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना 1500 रुपये लाभ दिला जातो. ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असतील त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये वितरित केले जाणार आहे. पीएम किसान योजनेचे 500 नमो शेतकरी योजनेचे 500 आणि लाडकी बहीण योजनेचे 500 असे मिळून या महिलांना 1500 रुपयाचे वाटप होणार आहे.

वटपौर्णिमेपूर्वी हप्ता मिळण्याची शक्यता:

शासनाकडून निधीचे वितरण झाल्यामुळे आता पुढील एक ते दोन दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. (ladki bahin yojana may installment date) लवकरच वटपौर्णिमेचा सण येत असून, त्यापूर्वीच हा हप्ता मिळाल्यास महिलांना मोठा आनंद होईल. याबद्दल अधिकृत घोषणा लवकरच महिला व बाल विकास मंत्र्यांकडून केली जाईल.

हे पण वाचा:
20250724 070246 लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता ‘या’ लाखो महिलांना मिळणार नाही लाभ.

Leave a comment