land records: 1980 च्या जुन्या सातबारा पहा एका क्लिक वर….

land records : भारत देशातील बहुतांश नागरिक शेतकरी आहेत. त्यांचे दैनंदिन जीवन हे शेतीवरच अवलंबून आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांची उपजीविका भागते. या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे त्यांच्या शेतीची सातबारा. बराच वेळा शेतीसंबंधी वादामुळे शेतकऱ्यांना जुन्या सातबारा देखील उपलब्ध कराव्या लागतात. जुन्या सातबारा उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कार्यालयांमध्ये अनेक चक्रा माराव्या लागतात. महाराष्ट्र राज्य शासनाने यासंबंधी जुन्या सातबारा डिजिटल स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी एक मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जुन्या सातबारा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला जातात.

आपल्या जुन्या असणाऱ्या सातबारा आपल्या मोबाईल मध्ये आपण डाऊनलोड करू शकता. ही प्रक्रिया काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे तर काही जिल्ह्यांमधील अद्याप पर्यंत काम पूर्ण झालेले नाही. ज्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील काम पूर्ण झाला आहे त्या ठिकाणच्या सातबारा आपण ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता. ऑनलाइन पद्धतीने सातबारा आपल्या मोबाईलवर सहज पद्धतीने पाहू शकतात. land records

land records

कोणत्या जिल्ह्यात जुन्या सातबारा डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध…

जुने रेकॉर्ड ऑनलाइन करून शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ही मोहीम राबवली. या मोहिमेच्या अंतर्गत सुरुवातीला ही सुविधा फक्त सात जिल्ह्यांमध्ये राबवली गेली होती. आता ही सुविधा राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे. राज्यातील कोणते 19 जिल्ह्यांमध्ये सुविधा राबवली जात आहे त्यांची यादी खालील प्रमाणे. land records

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

हे वाचा : शासनाचा महत्त्वाचा निर्णय! भू प्रणाम च्या माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे.

  • अमरावती
  • अकोला
  • अहिल्यानगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • चंद्रपूर
  • धुळे
  • गडचिरोल
  • गोंदिया
  • जळगाव
  • लातूर
  • मुंबई उपनगर
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पालघर
  • रायगड
  • सिंधुदुर्ग
  • ठाणे
  • वाशिम
  • यवतमाळ

19 जिल्ह्यातील जुन्या सातबारा ऑनलाइन पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. इतर जिल्ह्यातील सातबारा ऑनलाइन करण्याचे कामकाज देखील सुरू असून लवकरच त्या देखील उपलब्ध केल्या जातील. land records

अशा पहा जुन्या सातबारा

जुन्या सातबारा पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या संकेतस्थळावर https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords जावं लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमच्यासमोर ए रेकॉर्ड या नावाचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही आधी नोंदणी केली असेल तर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता. आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन्या पर्यावरण क्लिक करा. त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यावा लागेल. त्यानंतर तुमचा तालुका गावचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडून घ्यावा लागेल. अभिलेख प्रकारामध्ये तुम्हाला फेरफार सातबारा काय हवा आहे ते निवडावा लागेल. त्यानंतर तुमचा गट क्रमांक भरावा लागेल. गट क्रमांक भरल्यानंतर शोधा या पर्यावर क्लिक करा. शोधा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या गटासंबंधी उपलब्ध असणारे जुने फेर दिसून येतील. त्यापैकी तुम्हाला कोणत्या वर्षीचा सातबारा हवा आहे तो निवडावा लागेल. निवडल्यानंतर आपल्यासमोर आपली जुनी सातबारा दिसून येईल. त्याच ठिकाणी तुम्हाला ते सातबारा डाऊनलोड करायची जरी असेल तरी पर्याय देण्यात आलेला आहे. land records

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

Leave a comment