lek ladki yojana लेक लाडकी योजना असा मिळवा 1 लाख रुपये लाभ.

lek ladki yojana राज्य शासन तसेच केंद्र शासन महिला व मुलींच्या विकासासाठी . तसेच महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना देशात तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात राबवत असतो याच माध्यमातून राज्य शासनाकडून राज्यातील मुलींसाठी महत्त्वपूर्ण योजना ती म्हणजे लेक लाडकी योजना या योजनेचे अंतर्गत राज्यातील मुलींना एक लाख रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. हा आर्थिक लाभ कसा मिळवायचा त्यासोबतच यासाठी कोण पात्र असणार आणि अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखात आपण आज पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

किती व कधी मिळेल लाभ

लेक लाडकी योजने अंतर्गत एक लाख रुपयांचा लाभ दिला जातो हा लाभ टप्प्याटप्प्याने वितरित केला जातो कोणत्या टप्प्यात किती रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाते याबद्दलची माहिती खाली दिली आहे.

  • मुलीचा जन्म झाल्या नंतर 5000 हजार रुपये एवढी रक्कम बँक खात्यावर जमा केली जाते.
  • मुलगी इयत्ता पहिली या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर 6000 हजार रुपये एवढी रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
  • इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर बँक खात्यावर 7000 रुपये एवढी रक्कम जमा केली जाते.
  • अकरावी या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर 8000 हजार रुपये एवढी रक्कम बँक खात्यावर जमा केली जाते.
  • मुलीचे 18 वर्षे वय पूर्ण झाल्यास मुलीला एक रकमी 75000 हजार रुपये बँक खात्यावर जमा केले जातात.

हे वाचा: बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस

lek ladki yojana पात्रता

  • लेक लाडकी ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागू असेल.
  • पहिले आपत्य तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या पत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता/पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केले असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • दुसऱ्या प्रसूती वेळी जुळ्या आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल; मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू असेल.
  • लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.

lek ladki yojana लागणारे कागदपत्रे

  • लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला.
  • कुटुंबप्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र (प्राधिकृत अधिकाऱ्याने निर्गमित केलेले असावे.)
  • लाभार्थी मुलीचे आधार कार्ड.
  • पालकाचे आधार कार्ड (आई किंवा वडील).
  • बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
  • रेशन कार्ड.
  • मतदान कार्ड.
  • कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास).

अर्ज कोठे करावा.

लेक लाडकी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे अर्थ सादर करण्यासाठी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्जासोबत वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडून देणे आवश्यक आहे अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेला आहे. अर्ज सादर केल्यानंतर आपल्या अंगणवाडी सेविकेने कडून अर्ज सादर केल्याची पोचपावती घ्यावी.

अर्ज सादर केल्यानंतर पुढील प्रक्रिया.

lek ladki yojana लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आपण अर्ज अंगणवाडी सेविक यांच्याकडे सादर करतो अर्ज सादर केल्यानंतर अंगणवाडी सेविका यांच्याकडून या अर्जाची व्यवस्थित तपासणी केली जाईल आणि अर्ज मध्ये दिलेली माहिती बरोबर असल्यास अर्ज शासनाने निर्गमित केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन भरला जाईल.

अंगणवाडी सेविका यांनी भरलेला ऑनलाइन अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवला जाईल त्या ठिकाणाहून त्या अर्जाची महिला व बाल विकास विभागाकडून तपासणी होईल अर्ज तपासणी झाल्यानंतर पुढील कार्यवाही दोन महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल व अर्ज मंजूर झाल्यानंतर वितरित केली जाणारी रक्कम लाभार्थी यांच्या बँक खात्यावर डीबीटी च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

Leave a comment