Lic Vima Sakhi Yojana : केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत आहे.तर आज आपण आशीच एक योजना पाहणार आहोत जी दहावी पास असणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी आहे .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणातील पानिपत येथे “एलआयसी विमा सखी योजना” सुरू केली. भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) द्वारे चालवली जाणारी ही योजना महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी घेऊन आली आहे. यामुळे महिलांना विमा क्षेत्रात काम करण्याची आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

विमा सखी योजनेचे फायदे
विमा सखी योजना (Lic Vima Sakhi Yojana) ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत महिलांना दरमहा 7,000 रुपये मानधन मिळणार आहे , ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. या योजनेद्वारे महिलांना डिजिटल कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण मिळेल आणि त्या विमा पॉलिसी विकून अतिरिक्त कमिशनही मिळवू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्या स्वयंपूर्ण बनतील.
हे वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत 504 जागांसाठी भरती.
विमा सखी योजनेचे उद्दिष्ट
Lic Vima Sakhi Yojana योजनेचे उद्दिष्ट दोन लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. महिलांना आर्थिक शिक्षण व विमा जागरूकता देऊन, त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा या योजने मागचा उदेश आहे.
3 वर्षांत 2 लाखांहून जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी
ही योजना (Lic Vima Sakhi Yojana) महिलांसाठी दीर्घकालीन आर्थिक लाभ देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. एका महिलेला 3 वर्षांत एकूण 2 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी आहे. जर विमा सखीने अधिक विमा पॉलिसी विकल्या, तर तिला अतिरिक्त कमिशन मिळेल, ज्यामुळे तिचा नफा अधिक वाढेल. या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळण्याबरोबरच रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होईल.
Lic Vima Sakhi Yojana योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कौशल्ये
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी काही महत्त्वाचे निकष ठरवण्यात आले आहेत:
- अर्जदार महिलेने कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- महिलाचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान आसणे आवश्यक आहे
- महिला या योजनेच्या अंमलबजावणी क्षेत्रातील रहिवासी असावी.
- अर्जदार महिलेला सामाजिक कार्य किंवा गट कार्याचा अनुभव असावा.
- त्या महिलाना स्मार्टफोन आणि इंटरनेटचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना खालील कागदपत्रे आवश्यक असतील:
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- बँक खाते विवरण
- पासपोर्ट साईज फोटो
- वैध मोबाइल नंबर
ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन फॉर्मसोबत अपलोड करावी लागतील.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- Lic Vima Sakhi योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महिलांना एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर महिलांना होम पेजवरील बीमा सखी योजना यावर क्लिक करावे लागेल.
- बिमा सखी योजनेवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म भरावा लागेल.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करावी लागतील .
- त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करणे अगोदर सर्व माहिती व्यवस्थित भरली का हे तपासून पहावे लागेल.
- आणि अर्ज सादर करावा लागेल. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रिंट आऊट घेऊन भविष्यातील संदर्भासाठी ठेवावा लागेल.
- अशा पद्धतीने तुम्ही बिमा सखी योजनेसाठी अर्ज करू शकाल.
महिलांसाठी एक चंगली संधी
एलआयसी (Lic Vima Sakhi Yojana) विमा सखी योजना महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्य आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणारी प्रभावी योजना आहे. महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आणि विमा क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवण्यासाठी ही योजना मदत करेल. जर तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल, तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. Lic Vima Sakhi Yojana
1 thought on “Lic Vima Sakhi Yojana दहावी पास असलेल्या महिलांसाठी सुवर्णसंधी !सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या,3 वर्षात 2 लाखांहून अधिक पैसे कमवा…”