मागेल त्याला बोडी योजना magel tyala bodi yojana 2024

मागेल त्याला बोडी योजना magel tyala bodi yojana 2024

मागेल त्याला बोडी योजना magel tyala bodi yojana 2024

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   आपण आज या योजनेमध्ये बोडी योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेती सिंचनासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे.

आपण पाहतच आहोत की गेलेल्या दोन ते तीन वर्षात पावसाचे प्रमाण  खूप कमी झालेले पाहायला मिळत आहे नदी ,विहीर, तलाव यामध्ये वर्ष भर पाणी साठा उपलब्ध होत नाही आणि शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. काही पिके असे असतात की ज्यांना पाणी नाही दिले तर त्याची खूप मोठे प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे राज्यातील टंचाई परिस्थिती पाहता शेतकऱ्यांकडे स्वतःची सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन बोडी योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

या अगोदर शासनाकडून शेतीतील जलसिंचनाची उपलब्धता वाढविण्यासाठी विविध योजना मधून अनुदान पद्धतीने नवीन बोडी/बोडी दुरुस्ती योजना राबविण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.

भाताच्या पिकासह संरक्षित उलटाची व्यवस्था असावी त्या दृष्टिकोनातून भातखाचराच्या वरील बाजूस पूर्वपार पद्धतीने बोरी हा उपचार घेण्यात येतो.

बाडी म्हणजे भात शेतीचे वरच्या भागात मातीचे बांध घालून तयार केलेले छोटीशी जलाशय. या भागामध्ये सरासरी पर्जन्यमान 1100 मि.मि. पेक्षा जास्त असल्याने पावसाचे पडलेले पाणी साठवून त्याचा वापर पावसाच्या खंडित कालावधीमध्ये व पिकाचे गरजेनुसार संरक्षित सिंचन म्हणून करण्यात येतो. या बोडी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना  पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

मागेल त्याला बोडी योजना magel tyala bodi yojana

योजनेचे नाव

मागेल त्याला बोडी योजना magel tyala bodi yojana 2024

राज्य

महाराष्ट्र

लाभार्थी

राज्यातील शेतकरी

विभाग

नियोजन विभाग

 लाभ

बोडी बांधण्यासाठी आर्थिक अनुदान

उद्देश

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती पिकासाठी पाण्याची उपलब्ध करून देणे.

मागील त्याला बोडी योजना उद्देश

  •  या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती पिकाच्या सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने  मागेल त्याला बोडी योजना राबविण्यात आली आहे
  • राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उत्पादनात वाढ करणे .
  • राज्यातील तरुण पिढीला शेती क्षेत्राकडे कडे आकर्षित करणे.
  •  शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.

मागील त्याला बोडी योजनेची वैशिष्ट्ये

  •  या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येईल.

मागेल त्याला बोडी योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड

  • या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जातून लाभार्थ्याची निवड खालील प्राथमिकतेनुसार येईल .
  •  तुमच्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्याचा वारसदार शेतकरी.
  •  दारिद्र रेषेखालील (बीपीएल) शेतकरी.
  •  वरील दिलेल्या माहितीनुसार इथे सर्व प्रवर्गातील बोडी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे ज्येष्ठता यादीनुसार (प्रथम अर्ज सादर करणाऱ्या प्रथम प्रधान्य याप्रमाणे) या योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची जबाबदारी

  • नवीन बोडी चा कार्यक्रम शेततळे बांधण्याचे बोडीचे काम लाभार्थ्यांनी स्वतःच करा वयाचे आहे.
  •  नवीन बोडीचे कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम (अग्रीम) मिळणार नाही. कार्यरंभ आदेश मिळाल्यापासून बोडीचे काम एक महिन्यात पूर्ण करणे व काम  पूर्णत्वाच अहवाल सादर करणे लाभार्थी शेतकऱ्यावर बंधनकारक राहील.
  •  बोडीची निगा राखण्याची व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित  लाभधारकाची राहील.
  •  पावसाळ्यामध्ये बोडी मध्ये गाळ वाहून येणार नाही अथवा  साचणार नाही यासाठी सर्व उपाययोजना लाभार्थ्यांनी स्वतःच करावी.
  •  मंजूर आकारमानाची बोडी खोदणे हे लाभार्थ्यास बंधनकारक राहील.

योजनेअंतर्गत नवीन बोडी ची जागा निवडीचे तांत्रिक निकष

  • ज्या जमिनीतून पाणी पाजण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवडपा करावी.
  • मुरमाड, वालुकामय, सचित्र सच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा बोडीसाठी निवडू नये.
  •  टंचाईग्रस्त गावातील लाभ क्षेत्रात बॉडी घेता येईल त्यासाठी जलसंपदा विभागाच्या अटी व शर्ती लागू राहतील.

मागेल त्याला बोडी अटी व शर्ती लागू राहतील

  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  •  महाराष्ट्र राज्य बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी.
  •  बॉडी मध्ये पाण्याची  पुरेशी प्रमाणात आवक असावी अथवा तसेच पाणलोट क्षेत्र असावे.
  •  बोडीखाली भिजणारे क्षेत्र हे बोडी लाभार्थ्याचे मालकीचे असावे.
  •  या योजने करता लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे गरजेचे आहे.
  • मागील पाच वर्षात किमान एक वर्षात तरी 50पैशापेक्षा कमी पैसेवरी जाहीर झालेल्या गावांमधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.

मागेल त्याला बोडी योजना आवश्यक लागणारी कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  •  मोबाईल नंबर
  •  ईमेल आयडी
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो  आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला.
  •   दारिद्र्यरेषेखालील कार् रेशन कार्ड
  •  जमिनीचा7/12 व 8 अ
  • मागेल त्याला बोडी योजना अर्ज करण्याची पद्धत

मागेल त्याला बोडी योजना magel tyala bodi yojana 2024

मागेल त्याला बोडी योजना अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाइन

  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला आपल्या जिल्ह्यातील कृषी विभागात जाऊन मागेल त्याला बोडी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
  •  अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील
  •  व सदर अर्ज कृषी विभागातील अधिकाऱ्याजवळ जमा करावा लागेल
  •  अशाप्रकारे तुम्ही मागेल त्याला बोडी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

ऑनलाइन  पद्धत

  •  या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  •  होम पेजवर मागेल त्याला बोडी वर क्लिक करावे लागेल.
  •  आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारले सर्व माहिती व्यवस्थित भरून सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील

Leave a comment