Magel Tyala Solar Pump: सोलर पंप योजनेसाठी अर्ज केला आणि तुम्हाला वेंडर निवडण्याचा पर्याय आला, तर अशी करा पुढील प्रोसेस.

Magel Tyala Solar Pump : आज आपण या लेखामध्ये मागेल त्याला सौर पंप योजनेबद्दल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे. या अगोदरच्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया शुल्क भरले आहे. आता त्या शेतकऱ्यांसाठी वेंडर निवडण्याचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. आज आपण या लेखामध्ये वेंडर निवड प्रक्रिया कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Magel Tyala Solar Pump वेंडर निवडीचा पर्याय

आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे अर्ज केलेला आहे. तसेच अर्ज भरल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट प्रक्रिया पूर्ण केली आहे. आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्ज पण सबमिट झालेला आहे, अशा शेतकऱ्यांसाठी वेंडर निवडण्याचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये 14 वेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या उपलब्धतेनुसार वेंडर निवडता येणार आहे.

हे वाचा : रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी सुरू अशी करा ई पीक पाहणी

Magel Tyala Solar Pump वेंडर निवडण्याची प्रक्रिया

१. पोर्टलवर लॉगिन करा:

२. लाभार्थी सुविधा निवडा:

  • लॉगिन केल्यानंतर लाभार्थी सुविधा (Beneficiary Services) हा पर्याय निवडा.
  • येथे तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी संबंधित पर्यायावर क्लिक करा.

३. अर्जाची माहिती भरा:

  • अर्ज क्रमांक टाका.
  • एमटी आयडी / एमएस आयडी / एमके आयडी यापैकी योग्य क्रमांकाचा वापर करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतरची स्थिती तपासा.

४. वेंडर निवड करा:

  • अर्ज स्थितीमध्ये पेमेंट पूर्ण झाल्याचे दाखवल्यानंतर, वेंडर निवड पर्याय दिसेल.
  • तुमच्यासमोर 14 वेंडर्सची यादी दिसेल.
  • तीन एचपी, पाच एचपी, किंवा साडेसात एचपी यांपैकी तुमच्या आवश्यकतेनुसार वेंडर निवडा.

५. वेंडरची यादी तपासा:

  • उपलब्ध वेंडर्सची यादी पाहा.
  • तुमच्या जिल्ह्यातील वेंडरने केलेल्या कामाची आणि इंस्टॉलेशनची माहिती तपासा.

६. वेंडर Assign करा:

  • पसंतीचा वेंडर निवडून Assign Vendor बटणावर क्लिक करा.

७. OTP प्रक्रिया पूर्ण करा:

  • वेंडर निवडल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) येईल.
  • ओटीपी सबमिट करून वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करा.

महत्त्वाची टीप

  • वेंडर निवड प्रक्रिया व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करा.
  • जिल्ह्यातील उपलब्ध वेंडरची कामगिरी तपासून योग्य वेंडरची निवड करा.
  • तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल अधिक माहिती महावितरणच्या पोर्टलवर पाहता येईल.

सोलर पंप योजनेसाठी वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या अर्जावर पुढील कार्यवाही सुरू होईल. त्यामुळे शेतीसाठी हवी असलेली सुविधा लवकरच उपलब्ध होईल!Magel Tyala Solar Pump .

Magel Tyala Solar Pump

Leave a comment