मागेल त्याला सौर कृषि पंप योजना ; नवीन अर्ज सुरू : magel tyala sour krushi pump yojana 2024

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना 2024 MTSKPY मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सोलर पंप खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा अर्ज मागवणे सुरुवात केलेली आहे यातून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सोलार पंप बसवता येणार आहे आणि यातून विजेची बचत करता येणार आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोलार पंप बसवलेले आहेत आता उर्वरित शेतकऱ्यांनाही या संधीचा फायदा होण्यासाठी शेतकऱ्यांना सोलर पंप वाटप राज्य सरकारने सुरू केलेले आहे

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे पंप सरकार कडून 95 टक्के पर्यन्त अनुदानावर वितरित केले जातात. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना सौर पंप वितरित करण्यात येणार आहेत. या साठी शेतकऱ्यांना अर्ज करणे अवश्यक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया व कागदपत्र या बद्दल सविस्तर माहिती पाहुयात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana
मागेल त्याला सौर कृषि पंप योजना

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना लाभ :

सौर कृषी पंप योजना अंतर्गत सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे यामध्ये

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

1 हेक्टर पर्यन्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 Hp पंप दिले जातील.

1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 5HP पंप दिले जातील.

2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 Hp पंप दिले जातील.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

अशा तीन प्रकारचे पंप शेतकरी घेऊ शकतात यासाठी शेतकऱ्यांना पात्रता असणार आहे.

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना पात्रता

1. शेतकऱ्यांना स्वतःच्या नावावर जमीन असावे.

2. शेतकऱ्याचा स्वतःचा सातबारा असावा.

हे पण वाचा:
karj mafi honar कर्जमाफी होणार: मंत्री संजय राठोड यांचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! karj mafi honar

3. शेतकऱ्यांनी या योजने अंतर्गत या आधी अर्ज केलेला नसावा.

4. शेतकऱ्यांकडे एक एकर क्षेत्र असावे.

5. सामाईक क्षेत्र असेल तर सामाईक खातेदार यांची सहमती असेल तरच अर्ज करता येईल.

हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update

6. या आधी अटल कृषि सौर पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना अंतर्गत लाभ घेतलेला नसावा.

Mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र – आपण पात्र की अपात्र

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना आवश्यक कागदपत्रे :

हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक (राष्ट्रीय कृत बँकेचे)
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सातबारा खाते उतारा (जलस्त्रोत नोंद असणे आवश्यक )
  • जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती- जमाती साठी)
  • 8 अ उतारा
  • हमीपत्र
  • संमती पत्र (सामाईक खातेदार यांच्या साठी)

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना वैशिष्ट

  • शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र योजना
  • सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना सोयीचा दहा टक्के भरावा लागेल
  • अनुसूचित जाती जमाती यांना सोयीचा पाच टक्के भरावा लागेल
  • उर्वरित म्हणजेच सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती जमातीसाठी 95% हिस्सा केंद्र शासन व राज्य शासन मिळून भरणार आहे.
  • शेतकऱ्यांच्या जमीन क्षेत्रानुसार पंपाची वाटप केले जाते कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन एचपी व माध्यम क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 एचपी आणि जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 एचपी पंप दिले जाते.
  • वितरण केलेल्या पंपाची पाच वर्षे गॅरंटी दिली जाते.
  • यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची वीज बिल भरावे लागणार नाही.
  • शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात वीजनिर्मिती व दिवसा सिंचनासाठी सुविधा उपलब्ध होईल

MTSKPY उदिष्ट

  • शेतकऱ्यांना वीज बिलापासून मुक्त करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • शेतीसाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • दुर्मिळ भागातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्र बागायती करण्यासाठी प्रोस्थाहण देणे.
  • शेतकऱ्यांना वीज वीज उपलब्ध करून देऊन शेतीसाठी लागणाऱ्या विजेची सुविधा उपलब्ध करणे.
  • शेती उत्पन्न वाढ करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे.
  • विजेची कमतरता भरून काढण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढवने.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज निर्मिती करून देणे.
  • बागायती जमिनीची उत्पादकता जास्त असल्यामुळे बागायती क्षेत्र निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे.
  • विज बिलातून शेतकऱ्यावर पडणाऱ्या आर्थिक भारापासून शेतकऱ्यांची सुटका करणे.
  • देशातील वीज समस्या सोडवणे.

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना अर्ज कसा करावा :

राज्य सरकारने 13 सप्टेंबर 2024 पासून मागेल त्याला magel tyala solar pump yojana 2024 अंतर्गत नवीन पोर्टल सुरू केलेले आहे या पोर्टल द्वारे शेतकरी अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्यासाठी या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे आहे तिथे तुम्हाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करायचा आहे.

  • वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर आपणास लाभार्थी सुविधा हा टॅब दिसेल.
  • लाभार्थी सुविधा ह्या टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपणास अर्ज करा हा पर्याय निवडावा लागेल.
  • त्या नंतर अर्जदारचा मोबाइल क्रमांक व आधार क्रमांक भरावा लागेल.
  • शेतकऱ्याचा व्ययक्तिक तपशील व पत्ता भरावा लागेल.
  • शेतकार्याचे बँक तपशील भरावे लागेल.
  • शेत जमीन तपशील भरावा लागेल ज्या मध्ये जिल्हया तालुक गाव खाते क्रमांक व गट नंबर भरून गटामधील शेतकरी नाव निवडून घ्यावे लागेल.
  • शेतकाऱ्याकडे उपलब्ध असणाऱ्या जलस्त्रोत निवड करून घ्यावी लागेल. ज्याची नोंद सात बारेवर आहे टेक निवडावे. ( विहीर / बोअरवेल /तलाव /नदी/ धरण या पैकी एक)
  • त्या नंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील त्या मध्ये शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबूक , जमिनीचा सात बारा/ आठ अ , पासपोर्ट फोटो , सहमति पत्र, स्वयं घोषणा पत्र ही कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करावी लागतील.
  • कागदपत्र उपलोड करताना सर्व कागपदत्र स्पष्ट दिसत आहेत याची खात्री करूनच अपलोड करा.
  • शेवटी अर्ज सादर करा या पर्याय निवडून आपण भरलेले सर्व माहिती बरोबर आहे का ते तपासून घ्या.
  • भरलेली माहिती बरोबर असल्यास अर्ज सबमीट करा किंवा चुकीची माहिती दुरुस्त करून घ्या.
  • अर्ज सादर केल्या नंतर आपल्या समोर आपण अर्ज सादर केलेली पोहोच पावती दिसेल ती प्रिंट करा किंवा पीडीएफ मध्ये जपून ठेवा.
  • आपल्या मोबाइल नंबर वर एसएमएस देखील पाठवला जाईल.

अर्ज करताना काही अडचण निर्माण झाल्यास.

मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेत अर्ज करताना आपणस काही अडचण निर्माण जल्यास आपण खाली दिलेल्या हेल्प लाइन क्रमांका वर संपर्क साधू शकता.

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

१८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५  या वर कॉल करून आपल्याला उद्भवणाऱ्या अडचणीचे समाधान मिळवू शकता.

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना अर्ज सद्य स्थिति

अर्ज सादर केल्यानंतर आपल्या अर्जाची सद्य स्थिति आपणास पोर्टल वर पाहता येतील. आपल्या अर्जात काही त्रुटि असेल तरी सुद्धा आपणास त्या ठिकाणी दाखवण्यात येईल व आपण आपला अर्ज दुरुस्त करून परत पुढे पाठवू देखील शकता.

अर्ज सद्य स्थिति पाहण्यासाठी आपणस पोर्टल वर दिलेल्या लाभार्थी सुविधा या टॅब मध्येच अर्जाची सद्यस्थिति हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून आपल्या लॉगिन आयडी पासवर्ड वापरुन आपण आपल्या अर्जाची सद्य स्थिति पाहू शकता.

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

Leave a comment