Mahadbt Farmer yadi महाडीबीटी पोर्टलवर अशी पहा… कृषी योजनांची लाभार्थी यादी !

Mahadbt Farmer yadi : शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना त्या केंद्र सरकारच्या असो किंवा राज्य सरकारच्या या महाडीबीटी पोर्टलवर राबवल्या जातात.राज्यातील शेतकऱ्यांनी या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेले होते. त्या शेतकऱ्यांचे अनुदान थकीत होते. आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांची थकीत राहिलेले अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.Mahadbt Farmer yadi

Mahadbt Farmer yadi

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान वितरित

अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून असे प्रश्न निर्माण केले जात होते की, महाडीबीटी योजनेअंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या योजनांचा लाभ मिळतच नाही. अनुदानास विलंब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाली होती. परंतु आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. आता तुम्हाला हे अनुदान मिळाले की नाही घरबसल्या तुमच्या मोबाईल मध्ये पाहता येईल तसेच फक्त तुमचेच नाही तर तुमच्या गावातील अर्ज करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे अनुदान मिळालं का? कोण पात्र झालं? हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल मध्ये पाहू शकता .Mahadbt Farmer yadi

हे वाचा : लाडक्या बहिणींना कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता..! या महिलांना मिळणार 3000 ?

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी अशी पहा .

  • तुम्हाला ही यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login वर जावे लागेल .
  • महाडीबीटी पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे .
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला अर्जाची सध्यास्थिती तपासा ,लॉटरी यादी आणि निधी वितरित लाभार्थी यादी असे तीन पर्याय दिसतील.
  • ज्या लाभार्थ्याच्या अनुदानाचे वितरण झाले आहे किंवा जे लाभार्थी योजने अंतर्गत पात्र आहेत .
  • अशा लाभार्थ्यांची यादी तुम्हाला देखील पाहता येते,यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काही पर्याय दिसतील.
  • यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे ,त्यानंतर तुमचा तालुका ,आणि त्यानंतर तुमचे गाव निवडायचे आहे .
  • गाव निवडल्यानंतर तुमच्या गावाची यादी रिफ्लेक्ट होईल,यातून तुमचे गाव निवडायचे आहे .
  • समजा गाव निवडल्यानंतर तुम्हाला यामध्ये किती लाभार्थी पात्र आहे? याची मागील काही वर्षाची यादी तुम्हाला पाहता येईल .
  • तसेच सर्वात शेवटी 2024- 25 या वर्षातील तुमच्या गावातील लाभार्थी पात्र झालेले शेतकरी त्यांचेही नाव तुम्हाला पाहता येतील .
  • या यादीमध्ये तुम्हाला किती तारखेला अनुदान क्रेडिट झाला आहे? तसेच पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना कुठल्या घटकांसाठी हे अनुदान मिळाल आहे, याची सर्व माहिती तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन दिसेल .Mahadbt Farmer yadi

Leave a comment