Personal loan : माणसाच्या दैनंदिन गरजा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्यात दिवसेंदिवस महागाई नागरिकांना सतावतच आहेत. अशा स्थितीमध्ये अचानक पणे आपल्याला काही पैशाची आवश्यकता लागली किंवा अचानक एखादा काही नवीन व्यवहार करायचे ठरलं तर आपल्याकडे सर्वोत्तम पर्याय असतो तो म्हणजे कर्ज घेणे. या कर्जामध्ये सर्वात महत्त्वाचं कर्ज जे असते ते पर्सनल लोन. जर आपल्याला भविष्यात कधी लोन घेण्याचा विचार किंवा गरज निर्माण झाली तर आपण कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत किंवा कोणत्या बँकेकडे आपल्याला चांगल्या प्रकारे कर्ज उपलब्ध होऊ शकते याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे एचडीएफसी बँक या बँकेकडून अनेक नागरिकांना कर्ज वाटप केले जाते. यामध्ये व्यावसायिक कर्ज असेल पर्सनल लोन (Personal loan) असेल होम लोन असेल वाहन कर्ज असेल असे अनेक कर्ज या बँकेकडून वितरित केले जातात. याच बँकेच्या पर्सनल लोन बाबत आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Personal loan व्याजदर
देशातील काही महत्त्वाच्या बँकेपैकी एक महत्त्वाची बँक असणारी एचडीएफसी बँक. त्या बँकेकडून पर्सनल लोन ते 10.90% पासून सुरू केले जाते. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोर आणि उत्पन्न स्रोत चांगला असेल तर यामध्ये अधिक सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात. पर्सनल लोन हे तुम्ही कोणत्याही कामासाठी वापरू शकता. जसे आपण व्यावसायिक घेतलेली कर्ज आपल्या व्यवसाय वाढीसाठीच वापरावे लागते आणि घरासाठी घेतलेले कर्ज घरबांधणीसाठीच वापरावे लागते तसे या ठिकाणी कोणत्याही बंधन निर्माण होत नाही. पर्सनल लोन (Personal loan) तुम्ही तुमच्या कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापरू शकता. यामध्ये तुमचे शिक्षण असेल वैद्यकीय गरज असेल लग्न असेल किंवा वैयक्तिक काही दुसरा खर्च असेल किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही पर्सनल लोन मार्फत मिळाले रक्कम खर्च करू शकता. Personal loan
हे वाचा : 1980 च्या जुन्या सातबारा पहा एका क्लिक वर….
10 लाख कर्जावर किती हप्ता येईल
जर आपण एचडीएफसी बँकेकडून दहा लाख रुपयापर्यंत व्यक्ती कर्ज घेतले तर आपल्याला किती हप्ता भरावा लागू शकतो याची माहिती घेऊ. या गणितामध्ये आपण व्याजदर हा 10.90% पकडलेला आहे. या कर्जाची रक्कम दहा लाख रुपये एवढी पकडली आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षासाठी ग्राह्य धरण्यात आला आहे. या सर्व घटकांनुसार आपल्याला महिन्याला 21 हजार 693 रुपये एवढा हप्ता येऊ शकतो. यामध्ये आपल्याला आपल्याला मिळणारे व्याजदरानुसार आणि आपण घेतलेल्या रकमेनुसार हप्त्यामध्ये कमी जास्त देखील होऊ शकते.
कोणतेही कर्ज घेताना आपण सर्वप्रथम त्यासंबंधी आवश्यक असणारी सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. यामध्ये व्याजदर प्रोसेसिंग फीस आणि परतफेडीची प्रक्रिया या सर्व गोष्टींचा समावेश आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कारण कर्ज परतफेड करताना भविष्यात आपल्याला अडचणी निर्माण होणार नाहीत अशा पद्धतीने आपण सर्व माहिती आधीच घेणे आवश्यक आहे.Personal loan