maharashtra adhiveshan: हिवाळी अधिवेशनात राज्यातील नागरिकांसाठी घेण्यात आलेली 5 निर्णय! पहा सविस्तर.

maharashtra adhiveshan सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे . या अधिवेशनाला 16 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे . या हिवाळी अधिवेशनात सर्वसामान्य शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहे . तर आज आपण अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या पाच महत्त्वाचे निर्णय जाणून घेणार आहोत .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

maharashtra adhiveshan लाडकी बहीण योजना

राज्यातील महिलांसाठी मोठी मदत ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पाच हप्ते वितरित करण्यात आले असून, डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता हिवाळी अधिवेशनानंतर लगेच जमा केला जाणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे.

maharashtra adhiveshan

बळीराजा मोफत वीज सवलत योजना

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी बळीराजा मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. 7.5 एचपीपर्यंतच्या कृषी पंपधारकांना मोफत वीज देण्यासाठी 3 हजार 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जुलै 2024 पासून सुरू झालेली ही योजना पुढील पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मोदी आवास योजना

maharashtra adhiveshan हिवाळी अधिवेशनात या योजने संदर्भात ही मोठा निर्णय घेण्यात आला आहे . राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी मोदी आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातील नागरिकांकडे स्वतःचे हक्काचे घर नाही अशा नागरिकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे.या योजनेतून घरकुल बांधण्यासाठी 1250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. घर नसलेल्या ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. घरकुल अनुदानामुळे गरीब कुटुंबांना स्थिर निवासाचा लाभ होईल.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

महिलांसाठी राबविण्यात आलेली आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. गॅस नोंदणी महिलांच्या नावे असणे गरजेचे आहे. हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हे वाचा: ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज करण्याची संधी

मुंबईकरांसाठी विशेष निर्णय

मुंबईतील नागरिकांसाठी हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक प्रणाली सुधारण्यासाठी विशेष निधीची घोषणा करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात 1212 कोटी रुपयांची तरतूद करून करण्यात आली आहे.या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मेट्रोसाठी 1212 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे मुंबई मेट्रोच्या कामाला चालना मिळणार असून यामुळे मुंबईकरांना दैनंदिन प्रवासात दिलासा मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक अधिक प्रभावी होईल.

निष्कर्ष

maharashtra adhiveshan या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ओबीसी नागरिकांसाठी आणि मुंबईकरांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या योजना प्रभावी ठरणार आहेत.

Leave a comment

Close Visit Batmya360