maharashtra cabinet list महायुतीचे मंत्री ठरले! मंत्रिपदासाठी कोणा कोणाला मिळणार संधी; भाजप ,शिवसेना ,राष्ट्रवादी, पहा संपूर्ण यादी.

maharashtra cabinet list महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकूण 39 मंत्री शपथ घेणार आहेत. आज मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या महायुतीच्या आमदारांची नावे समोर आलेली आहे.

maharashtra cabinet list भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित 20 मंत्रिपदे आली आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदे यांच्या सहित 12 मंत्रीपदे मिळणार आहेत. शिवसेनेचे 11 मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासह 10 मंत्रीपदे मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी कॉल करण्यात आला, पहा संपूर्ण यादी…

भाजपकडून मंत्रिमंडळात कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी संधी?

  1. नितेश राणे
  2. शिवेंद्रराजे भोसले
  3. चंद्रकांत पाटील
  4. पंकज भोयर
  5. मंगलप्रभात लोढा
  6. गिरीश महाजन
  7. जयकुमार रावल
  8. पंकजा मुंडे
  9. राधाकृष्ण विखे पाटील
  10. गणेश नाईक
  11. मेघना बोर्डीकर
  12. अतुल सावे
  13. जयकुमार गोरे
  14. माधुरी मिसाळ
  15. चंद्रशेखर बावनकुळे
  16. संजय सावकारे
  17. अशोक उईके
  18. आकाश फुंडकर
  19. आशिष शेलार

शिवसेनेकडून मंत्रिमंडळात स्थाकोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी संधी?

  1. उदय सांमत
  2. प्रताप सरनाईक
  3. शंभूराज देसाई
  4. योगेश कदम
  5. आशिष जैस्वाल
  6. भरत गोगावले
  7. प्रकाश आबिटकर
  8. दादा भूसे
  9. गुलाबराव पाटील
  10. संजय राठोड
  11. संजय शिरसाट

राष्ट्रवादीकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी संधी?

  1. आदिती तटकरे
  2. बाबासाहेब पाटील
  3. दत्तमामा भरणे
  4. हसन मुश्रीफ
  5. नरहरी झिरवाळ
  6. मकरंद पाटील
  7. इंद्रनील नाईक
  8. धनंजय मुंडे
  9. माणिकराव कोकाटे

मंत्रिमंडळातील एकूण मंत्री आणि विभागीय वाटप:

  • भाजपचे: 20 मंत्री
  • शिवसेनेचे: 12 मंत्री
  • राष्ट्रवादीचे: 10 मंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी यापूर्वीच शपथ घेतली आहे. आता उर्वरित आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

maharashtra cabinet list विशेष बाबी:

  • नागपूरमधील राजभवनाच्या लॉनवर आज दुपारी तीन वाजल्यापासून शपथविधी सोहळा होणार आहे.
  • नागपूरमध्ये 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडत आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमधील आगमन आज पहिल्यांदाच होत आहे, ज्यासाठी नागपूर शहर भगवामय करण्यात आले आहे.

महत्त्वाचे निर्णय अपेक्षित:

महायुती सरकारच्या या मंत्रिमंडळाकडून शेतकरी मदत योजना, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या धोरणांवर त्वरित निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.

शपथविधी सोहळ्यानंतर महायुती सरकारचे आगामी कार्यकाल आणि धोरणे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

Leave a comment